Kolhapur : किड्या मुंग्यांसारखी चिरडली माणसं, 3 ठार; थरकाप उडवणारा Video
Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये भरधाव कारने तीन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार अक्षरश: हवेत उडाले होते. या अपघातात कारने पाच जणांना धडक दिली होती. यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. तर चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापूरातील सायबर चौकात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Kolhapur Accident News : दिपक सुर्यवंशी,कोल्हापूर : जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत भरधाव कारने पाच दुचाकींना जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, अनेक दुचाकीस्वार अक्षरश: हवेत उडाले होते. या अपघातात आता तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. कोल्हापूरातील सायबर चौकात ही घटना घडली आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होतं आहे.(kolhapur accident news car crushed 5 two wheeler 3 death and three injured cyber chowk incident)
ADVERTISEMENT
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या सेंट्रो कारने चार ते पाच दुचाकींना उडवलं होतं. कारची ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील अनेक जण हवेत उडाले होते. सायबर चौकात दुपारी अडीच वाजता ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चालक वसंत चव्हाण यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. या जखमींना आता तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होतं आहे. दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडवतोय.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Lok Sabha : निकालाआधीच ठाकरेंना झटका, निवडणूक आयोग कारवाई करणार?
या अपघातात कार चालक वसंत चव्हाण यांच्या डोक्यावर पट्टी बांधली होती. गाडी चालवत असताना त्याला अचानक चक्कर आल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यातून त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे. सायबर चौकात वर्दळ असताना आज दुपारी 2.30 वाजता ही थरारक घटना घडली आहे.
एका 8 महिन्यांच्या चिमुकल्याने या अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर मुलाची आई किरकोळ जखमी झाली आहे. या अपघाताच्या घटनेनंतर जखमींना जवळच्या वरूट हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल आणि सीपीआरमध्ये उपचाराखातर दाखल करण्यात आले होते. यामध्ये सीपीआरमध्ये नेलेल्या 16 वर्षीय हर्षद पाटीलचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हर्षदने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, अशी माहिती महेंद्र पंडित यांनी दिली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Exit Poll : 12 जागांवरील निकाल महाराष्ट्राला देणार धक्का! पाहा कोणते मतदारसंघ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT