कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, माधुरी हत्तीण मूळ घरी परतणार, वनताराची पोस्ट व्हायरल

मुंबई तक

Madhuri elephant : वनतारा येथे वर्षभर उपचार घेतल्यानंतर माधुरी हत्तीण आता पूर्णपणे निरोगी झाली असून ती कोल्हापूरमधील आपल्या मूळ घरी परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

ADVERTISEMENT

Madhuri elephant
Madhuri elephant
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी

point

माधुरी हत्तीण मूळ घरी परतणार, वनताराची पोस्ट व्हायरल

Madhuri elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात माधुरी हत्तीणीच्या (Madhuri elephant) पुनरागमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कायदेशीर अडथळे दूर झाल्यामुळे येत्या महिन्याभरात माधुरी हत्तीचे पुन्हा मठात आगमन होणार असून, त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण केली जात आहे. दरम्यान, तिच्या बाबत वनताराकडून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली आहे. वनताराने यामध्ये काय म्हटलंय? जाणून घेऊयात...

हेही वाचा : जालना हादरलं, पत्नी अन् 4 मुलींनी मिळून बापाला संपवलं, नेमकं काय घडलं?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vantara (@vantara)

वनताराची पोस्ट जशीच्या तशी 

एका वर्षापूर्वी माधुरी 'वनतारा'मध्ये आली. येथे तिला खूप प्रेम, काळजी आणि आधार मिळाला. त्या दिवसापासून पशुवैद्यकीय डॉक्टर, तिची काळजी घेणारे सेवक, आहारतज्ज्ञ अशा संपूर्ण टीमने अहोरात्र कष्ट केले. माधुरीला तिच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर हवी ती मदत आणि प्रेम मिळावे, यासाठी ते नेहमी तत्पर होते. आम्ही सर्वजण मिळून माधुरीला एक नवीन आणि सुखी आयुष्य मिळावे, यासाठी पूर्णपणे कटिबद्ध होतो.

हेही वाचा : मुंबईची खबर : 20 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, मान्सून रखडल्याने मुंबईकरांसमोर मोठं संकट

हे वाचलं का?