लाइव्ह

Ratan Tata Death News LIVE : रतन टाटा अनंतात विलीन, वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ratan Tata Passed Away Live Update: टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

ADVERTISEMENT

यासंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

 

ADVERTISEMENT

  • 06:34 PM • 10 Oct 2024

    Ratan Tata Death: रतन टाटा अनंतात विलीन

    Ratan Tata: मुंबईतील वरळी स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

  • 04:09 PM • 10 Oct 2024

    Ratan Tata passes away LIVE : रतन टाटा यांचा शेवटचा प्रवास सुरू

     

    रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

     

  • 01:05 PM • 10 Oct 2024

    Ratan Tata passes away LIVE : रतन टाटा यांच्यावर पारसी प्रथेनुसार अंत्यसंस्कार

    रतन टाटा यांचे पार्थिव दुपारी ४ वाजेपर्यंत एनसीपीए येथे ठेवण्यात येणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी वरळी येथील पारसी स्मशानभूमीत आणले जाईल. जिथे पारसी प्रथेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

     

  • 12:13 PM • 10 Oct 2024

    Ratan Tata passes away LIVE: रतन टाटा यांचं पार्थिव NCPA मध्ये किती वाजेपर्यंत असेल?

    रतन टाटा यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी मुंबईतील NCPA येथे ठेवण्यात आलं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत पार्थिव येथे असेल. समाजाच्या विविध क्षेत्रातील सर्वच मंडळी पार्थिवाच्या दर्शनासाठी येत आहेत.

     

  • ADVERTISEMENT

  • 12:12 PM • 10 Oct 2024

    मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर वरळी स्मशानभूमीत

     

    रतन टाटा यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी आढावा घेतला. 

  • 11:24 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata passes away LIVE: राज ठाकरे यांची रतन टाटांसाठी भावनिक पोस्ट

    राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याबाबतच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब, असं म्हणत राज ठाकरेंनी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली.

     

  • ADVERTISEMENT

  • 11:22 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata Passed Away Live : संजय राऊत यांची रतन टाटांना श्रद्धांजली

     

    रतन टाटा हे उद्योग जगतातील मोठं नाव आहे. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली. मुंबई शहरासाठी रतन टाटांचं योगदान मोठं आहे. टाटा गेले यावर विश्वासच बसत नाही.

     

  • 09:46 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata passes away LIVE: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटली गर्दी, वरळीत होणार अंत्यसंस्कार 


    सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत काल रात्री 86 व्या वर्षी निधन झालं. ब्रिच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वार्धक्यामुळे त्यांना काही शरीराचे त्रास जाणवत होते. सोमवारी रतन टाटा यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ‘मी ठीक आहे’ अशी एक पोस्ट लिहिली होती. पण त्यांची प्रकृती अचानक ढासळत गेली. त्यानंतर त्यांनी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईत येणार आहे. रतन टाटा यांच्यावर वरळी इथे अंत्यसंस्कार होणार. 
     

  • 09:10 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata Passed Away Live Update : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाहिली श्रद्धांजली

     

     

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

  • 09:09 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata Passed Away Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

    रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

  • 09:09 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

     

  • 09:08 AM • 10 Oct 2024

    Ratan Tata Passed Away Live Update : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

     

    प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.

    मात्र बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

follow whatsapp

ADVERTISEMENT