लाइव्ह

Sindhudurg Rain News Live : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अतिवृष्टी, उद्या शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sindhudurg Rain, Sindhudurg  heavy rain, maharashtra rain, rain update
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.
social share
google news

Maharashtra Mumbai Rain Updates : अखेर मान्सूनने महाराष्ट्रभर सक्रिय झाला आहे. कोकणासह मुंबई, पुण्यात पावसाला सुरूवात झाली असून, राज्यातील इतर भागांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. 

ADVERTISEMENT

शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. 

शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. 

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील सर्व अपडेट्स वाचा. 

त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचे ताजे अपडेट्सही लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील....

ADVERTISEMENT

  • 10:04 PM • 07 Jul 2024

    सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अतिवृष्टी, उद्या शाळांना सुट्टी जाहीर

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. उद्या दुपारी कॅबिनेटची बैठक आहे. त्यापूर्वी प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांना दिल्या आहेत. पुराच्या पाण्यात गाडी घालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. पुराची परिस्थिती अशीच राहील्यास उद्या शाळांना सुट्टी देण्यात येईल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.

    रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील 3 तास महत्वाचे आहेत. रत्नागिरीत पुढील 3 तास मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

  • 07:16 PM • 07 Jul 2024

    ''सरकारने आमचा अंत पाहू नये'', जरांगे स्पष्टच बोलले

    सरकारला परभणीतील नगरीतून सांगतोय, आमचा अंत पाहू नका. एकदा दोरी सुटली तर मग अवघड होईल, मराठा अन् कुणबी एकच आहे ही पहिली मागणी आहे. मराठ्यांच्या मतांचा कचका कसाय हे त्यांना कळलंय, त्यामुळे ते आता नादी लागणार नाहीत, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सरसकट ओबीसी आरक्षणावरुन इशारा दिलाय.  

  • 05:41 PM • 07 Jul 2024

    वीज कंपन्यांना सरकारचा दिलासा

    ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    आज सह्याद्री अतिथी गृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्या मध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.500/- चा भत्ता रु.1000/- इतका करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

  • 02:47 PM • 07 Jul 2024

    डोंबिवली हादरली! एमआयडीसीत पुन्हा भीषण स्फोट

    डोंबिवलीच्या एमआयडीसीत पुन्हा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीत एका मागोमाग दोन स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. या स्फोटात अद्याप तरी जिवितहानी झाल्याची कुठलीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेने डोंबिवली पुन्हा हादरली आहे. 

  • ADVERTISEMENT

  • 01:22 PM • 07 Jul 2024

    Sindhudurg Rain News Today Live : सिंधुदुर्ग जिल्ह्याशी 27 गावांचा संपर्क तुटला

    मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, आळवाडी परिसरात पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आळवाडी येथे मोटार पाण्यात बुडाली आहे. 

    बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी आले असून, माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

  • 01:02 PM • 07 Jul 2024

    Maharashtra Rains Update : अर्जूना नदीला पूर... रस्ता पाण्याखाली, वाहतूक बंद

    सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. अर्जूना नदीच्या पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापारी सतर्क झाले असून, दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी नेण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.

    अर्जूना नदीच्या पुराच्या पाण्याने कोदवली नदीच्या पाणी अडवले आहे. त्यामुळे फणसवाडीतील रस्ता कोदवली नदीच्या पाण्याखाली गेला असून वाहतूकीस बंद झाला आहे. राजापूर नगर परिषदेने धोकादायक झालेला वासुकाका पूल पावसाला सुरुवात होताच वाहतुकीसाठी बंद केलेला असल्यामुळे आंबेवाडी हर्डी परिसरातील नागरिकांना राजापूर शहरात व बाजारपेठेत येण्यासाठी एसटी डेपो मार्गे सहा किलोमीटर वळसा घालावा लागणार आहे.

    Maharashtra Rains Updates
    नदीला पूर आल्याने रस्ते बंद झाले आहेत.
  • ADVERTISEMENT

  • 12:34 PM • 07 Jul 2024

    Mumbai Rains News : मुंबई, ठाण्यात एनडीआरएफची पथके

     

    मागील काही तासांपासून सुरू असलेला संततधार पाऊस आणि पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा, या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

    मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील कुर्ला, घाटकोपर, तर पालघर आणि ठाण्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

  • 12:27 PM • 07 Jul 2024

    Maharashtra Rains Update : शहापूरध्ये १५० पर्यटक अडकले पुरात

    ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

    शहापूरमध्येही पूर परिस्थिती उद्भवली असून, वाशिंदमधील सृष्टी फार्मवर १५० पर्यटक अडकले. या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान दाखल झाले. 

    एनडीआरएफच्या जवानांकडून या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. भातसा नदीला मोठा पूर आला असून, वाशिंदमधील सृष्टी फार्मलाही याचा फटका बसला. 

    अचानक पाणी वाढल्याने सृष्टीचा फार्मचा संपर्क तुटला होता. पाण्याने वेढा दिल्याने पर्यटक अडकले होते. अखेर एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत, बचाव कार्य हाती घेतले. 

  • 10:30 AM • 07 Jul 2024

    Mumbai rains : मुंबई लोकल सेवा विस्कळीत, एक्स्प्रेस गाड्याही अडकल्या 

    मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. 

    पावसामुळे आटगाव स्थानकाजवळ झाडे कोसळली, तर काही ठिकाणी रुळावर माती आी आहे. त्यामुळे कल्याणवरून कसाराकडे जाणारी वाहतूक बंद आहे. याचा परिणाम मुंबई लोकल सेवेबरोबरच एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला आहे. 

    मुंबईवरून उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या आणि उत्तर प्रदेश, बिहारवरून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर उभ्या करण्यात आल्या आहेत. 

  • 09:22 AM • 07 Jul 2024

    Mumbai rain news today live : मध्य रेल्वे लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने

    मुंबईत पावसाचा जोर वाढताच लोकल सेवा विस्कळीत झाली. कसारा, कर्जत कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. कसारा ते कल्याण दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. 

  • 09:15 AM • 07 Jul 2024

    Mumbai rain live news : पुणे, ठाण्यासह पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

    हवामान विभागाने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. 

    नाशिक, ठाणे, पुणे, रायगड,रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून, या जिल्ह्यात दिवसभरात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असला, तरी रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. 

    maharashtra weather Update map
    महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसा असेल पाऊस, कुठे कसे असेल हवामान, पहा नकाशा.
follow whatsapp

ADVERTISEMENT