Maharashtra Weather : राज्यात लवकरच पाऊस धडणार, 'हे' 16 जिल्हे भिजणार
Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 10 जून 2026 रोजी एकूण 16 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला, जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या मान्सूनपूर्व परिस्थिती
एकूण 16 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला
Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 10 जून 2026 रोजी एकूण 16 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला. ज्यात कोकण विभागातील 2 जिल्ह्याचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
हे ही वाचा : दोन बहिणी मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत मोबाइलवर... पुढच्या क्षणीच दोघींचा मृत्यू
कोकण
कोकणात पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुपारी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्याला हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि रायगड या दोन जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट वर्तवण्यात आला नाही. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.









