Maharashtra Weather : राज्यात 'या' भागांना पाऊस झोडपणार, 15 जिल्ह्यांना IMD अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात दुहेरी वातावरण कायम राहणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात दुहेरी वातावरण कायम
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार
Maharashtra Weather : राज्यात दुहेरी वातावरण कायम राहणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील 3 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर 3 जिल्ह्यांना उष्णतेचा आणि आणखी 3 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिक शक्यता असणार आहे. जाणून घ्या 24 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : डोंबिवली : ड्रग्सविरोधात कारवाई, महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी..
कोकण
कोकण विभागातील पुढील काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात हवामानात सातत्याने बदल जाणवत असून पुणे, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलाय. विभागातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.









