‘मी स्वतःचा मृतदेह बघत होतो..’, 28 मिनिटाने जिवंत झालेल्या व्यक्तीचा भयानक अनुभव!

मुंबई तक

ADVERTISEMENT

How it felt after death, Australian man recounts his terrifying experience
How it felt after death, Australian man recounts his terrifying experience
social share
google news

माणूस मेल्यावर त्याला काय आणि कसं वाटत असेल? असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही म्हणालं, मी कुठे अनुभव घेतला आहे, मला कसं माहित असणार? पण ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने हा अनुभव घेतला असून त्याने त्याचा अनुभव जगासोबतही शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाचे फिटनेस इंस्ट्रक्टर आणि taekwondo ट्रेनर फिल जेबल (5इ7) असं हा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. (How it felt after death, Australian man recounts his terrifying experience)

ADVERTISEMENT

फिल जेबल यांना नोव्हेंबर महिन्यात बास्केटबॉल खेळाताना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तांत्रिकदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले होते. तब्बल 28 मिनिटे ते मृतावस्थेमध्ये होते. फिल म्हणतात, यादरम्यान मला आपण आपल्या शरीरातून बाहेर आलो असल्यासारखं आणि हवेत तरंगून स्वतःचा मृतदेह वरुन बघत आहोत, असं वाटत होतं.

हे ही वाचा : Bengaluru Viral Video : केस ओढले, कानाखाली खेचली… सेलमधील साड्यांसाठी भिडल्या महिला

फिल यांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचा मुलगा जोशुआने त्यांना सीपीआर देता येईल असा विचार करुन ऑफ ड्युटी नर्सला मदतीसाठी बोलावले. त्यानंतर फिल यांना थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे ते 3 दिवस बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. या दरम्यान, त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही पार पडली. ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ते 28 मिनिटे तांत्रिकदृष्ट्या मृत होते. पुढे एका आठवड्यानंतर फिल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

हे वाचलं का?

फिल यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले?

फिल यांनी स्वतःचे वर्णन ‘मिरॅकल मॅन’ असं केलं आहे. ते म्हणाले, ‘मी कुठेही जात नाही. मी बास्केटबॉल आणि माझ्या चाहत्यांचा ऋणी आहे. माझ्या मदतीसाठी आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते.’ फिल यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘हे सर्व तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. यामुळे तुम्ही पुढे जात राहता. माझ्या आयुष्यात फक्त एकच महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे, हार्ड फिजिकल ट्रेनिंग आणि तेही प्रत्येकाला.

हे ही वाचा : कधी बिकिनी गर्ल तर कधी कपलचा किस… वैतागून मेट्रो प्रशासनाचं मजेशीर ट्विट

फिल म्हणाले, मृत्यूच्या तोंडातून परत आल्यानंतर माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. खेळातून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल मला पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. ते म्हणाले, ‘आपण ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल काळजी करतो, तेवढी त्यांची किंमतही नसते. आपण एखादी गोष्ट करु शकत नाही, हे कधीही कोणालाही सांगू नका. फिलला आशा आहे की त्यांची कथा इतरांना प्रेरणा देईल. त्यांनी लोकांना सीपीआर शिकण्याचा सल्लाही दिला आहे, जेणेकरून ते एखाद्याचा जीव वाचवू शकतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT