Mumbai, Thane, Pune Rains Weather, IMD Live updates : पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळे भडकल्या, ''सरकारने फोडाफोडी करण्यापेक्षा...'',
Maharashtra Mumbai Weather Forecast live : 26 जुलै रोजी मुंबईसह महाराष्ट्रात तुफान पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील हवामानासह इतर महत्त्वाच्या बातम्याचे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Maharashtra Weather Updates Live : राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
अतिवृष्टीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दुसरीकडे नवी मुंबई, ठाणे शहरातल्या शाळांनाही आज सुट्टी देण्यात आलीय. ठाणे, नवी मुंबई मनपाच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक तसंच माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर झालीय.. हवामान विभागाने ठाणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच कल्याण डोंबिवलीमधल्या सर्व शाळांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. महाराष्ट्रातील हवामानाच्या बातम्यासह इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...
ADVERTISEMENT
- 05:49 PM • 26 Jul 2024
पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळे भडकल्या, ''सरकारने फोडाफोडी करण्यापेक्षा...'',
पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सुप्रिया सुळे सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या,अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. महिला रडतायत, मुलांची कागदपत्रे हरवली आहेत. अनेक महिलांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. सरकार काल अनेक गोष्ट करू शकली असती, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. थोडा वेळ घरं फोडा, पक्ष फोडा थोडं बाजूला ठेवा, आणि माणुसकी दाखवा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच पुरस्थितीचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे. पुण्यात हिट अॅड रन, रक्ताचे सॅम्पल बदलणे या घटनांमुळे सुरक्षित पुण्याला कुणाची तरी नजर लागलीय, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
- 04:10 PM • 26 Jul 2024
Pune Rain Alert : पुणेकरांसाठी चांगली बातमी, खडकवासला धरणात विसर्ग कमी!
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सायंकाळी ४ वाजता ४ हजार ७०८ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी. पावसाच्या प्रमाणानुसार आणि क्यूसेकनुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे येथून ही माहिती देण्यात आलेली आहे.
- 02:32 PM • 26 Jul 2024
सांगली, मिरजेत पूरस्थिती गंभीर, कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी
सांगली, मिरजेत पूरस्थिती गंभीर झाली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 38 फुटापर्यंत पोहोचली आहे. तर मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली. वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस होत असल्याने दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता धोका पातळीकडे वाटचाल सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस सातत्याने नदीकाठावरील नागरिकांना घरे सोडून निवारा केंद्राकडे जाण्यासाठी आवाहन करत आहे.
- 11:47 AM • 26 Jul 2024
Pune Rain Alert : मुरलीधर मोहोळ यांनी साधला पुरग्रस्तांशी संवाद
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ एकता नगर मधील नागरिकांशी संवाद साधत आहेत. एकता नगर मधील नागरिक मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत आहेत. नदीपात्रातील रस्त्याचा भराव टाकल्यामुळे पाणी एकता नगरमध्ये घुसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावेळी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
- 11:41 AM • 26 Jul 2024
Maharashtra News: जळगाव येथे पावसामुळे शेतांमध्ये साचलं पाणी
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतांमध्ये साचलं पाणी.. जळगाव तालुक्यासह परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं आहे… शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- 09:28 AM • 26 Jul 2024
Kolhapur News : पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, कोल्हापूरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी!
पंचगंगा नदीमुळे कोल्हापूर शहरातील सकल भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली...
कोल्हापूरच्या कुंभार गल्ली येथे पाणी शिरलं असून काही नागरिक स्थलांतरित झाले आहेत
तर अजूनही काही नागरिक आपल्या घरामध्येच थांबून आहेत
- 08:51 AM • 26 Jul 2024
Kolhapur Rain Update : कोल्हापूरच्या पंचगंगेला पूरस्थिती गंभीर
धोका पातळीवर वाहतेय पंचगंगा नदी
कोल्हापूर जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणाचे ६ स्वयंचलित दरवाजे खुले
राधानगरीचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3,4,5,6,7,1 उघडले
धरणातून प्रति सेकंद 10068 क्युसेक पाण्याचा विसर्ग
पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट 6 इंच वर
( पंचगंगा नदीची धोका पातळी - *43'00 फूट आहे.)
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच
मुसळधार पावसाने एका राष्ट्रीय महामार्गासह 11राज्य मार्ग, 29 प्रमुख जिल्हा मार्ग , 13 इतर जिल्हा मार्ग आणि 25 ग्रामीण मार्ग पुराचे पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद
पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने पूरग्रस्त भागातील लोकांची चिंता वाढली..
जिल्ह्यातील वाहतुकीबरोबरच जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ७०० हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर
शाळा महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर...
शहराच्या न्यू पॅलेस महावीर कॉलेज परिसरातील नागरिकांनी आपली चार चाकी वाहन सुरक्षित राहण्यासाठी कसबा पावडर महावीर कॉलेज रोड वरती पार्किंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहेत....कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कालपासूनच इथल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांची महत्त्वाची दस्तावेज पेपर सुरक्षित गट्टे बांधून उंच भागांवरती कपाटात वरती ठेवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2019 21 ला जिल्हाधिकारी कार्यालयात पाच ते सहा फूट पाणी आल्याकारणाने खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचारी कालपासूनच या कामाला लागलेली आहेत...
- 08:28 AM • 26 Jul 2024
Mumbai Rain Update : मुंबईत रेल्वे वाहतूक उशिराने, रस्ते वाहतूक सुरळीत
मुसळधार पडणा-या पावसाने मुंबईत उसंत घेतलीय...त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असून, शाळा, कॉलेज आज मुंबईत सुरू आहेत...मात्र, मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतायत...मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय...शाळा कॉलेज आज सुरू असून, अधिक माहितीसाठी शाळा, कॉलेज व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
- 08:26 AM • 26 Jul 2024
Kolhapur News : कोल्हापुरात 2 दिवस शाळा आणि कॉलेजना सुट्टी
कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूरच्या शाळा आणि कॉलेजेसना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्यामुळे 26 आणि 27 जुलै असे दोन दिवस शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडया, सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक – माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांना सुट्टी राहील.
- 08:25 AM • 26 Jul 2024
Pue-Mumnbai Train Update: पुणे-मुंबई धावणाऱ्या 3 ट्रेन आज रद्द
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या तीन ट्रेन आज रद्द करण्यात आल्यात. डेक्कन क्वीन, प्रगती, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई शहरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT