नागपूरमधील ‘मविआ’च्या वज्रमूठ सभेत अजित पवार करणार नाही भाषण, कारण…

योगेश पांडे

ADVERTISEMENT

ajit pawar will not address in mva vajramuth sabha in nagpur
ajit pawar will not address in mva vajramuth sabha in nagpur
social share
google news

महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात वज्रमूठ सभा आयोजित केल्या जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाल्यानंतर दुसरी सभा आज नागपूरमध्ये होत आहे. या सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं भाषण असणार की नाही, याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान, नागपूरच्या सभेत कोणत्या नेत्यांची भाषणे होणार याची माहिती समोर आली असून, अजित पवार सभेला उपस्थित असणार आहे. मात्र, ते भाषण करणार नाहीत. याबद्दल अजित पवारांनीच खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेत सहा नेत्यांची भाषणे होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी नेत्यांची नावं जाहीर केली. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे भाषण करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांची भाषणं होणार आहेत. शिवसेनेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचं भाषण होणार आहे.

नागपूरच्या सभेत भाषण का करणार नाही? अजित पवारांनी दिलं उत्तर

अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या 6-7 सभा होणार आहेत. याची सुरूवात छत्रपती संभाजीनगरपासून केली. दुसरी सभा नागपूरला आहे. तिसरी सभा मुंबईला आहे. चौथी सभा पुण्याला आहे. शेवटची सभा अमरावतीला आहे. त्याआधी नाशिक आणि कोल्हापूरलाही सभा आहे. अशा या सभा ठरलेल्या आहेत. आधीच ठरलं होतं की, प्रत्येक पक्षाच्या दोघांनी भाषणं करायची. ती कुणी करायची ते त्या पक्षाने ठरवायचं. छत्रपती संभाजीनगरला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांनी भाषण केलं. तिथे मी आणि धनंजय मुंडेंनी भाषण केलं. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांनी भाषण केलं.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? शरद पवारांचं सूचक विधान, राऊतांनी सांगितली स्टोरी

“छत्रपती संभाजीनगरच्या सभेत प्रदेशाध्यक्षही होते. जयंत पाटलांनी मला सांगितलं की, आपलं ठरलं आहे, तर त्याप्रमाणे वागू. आता इथे (नागपूर) आमच्याकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करतील. विदर्भातील सभा आहे. अनिल देशमुख विदर्भातील आहेत, तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे करणार आहेत. सभा आटोपशीर व्हावी हा त्यामागचा दृष्टिकोण आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

फडणवीसांच्या होमपिचवर महाविकास आघाडीची सभा, अजित पवार म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस यांच्या होमपिचवर महाविकास आघाडीची सभा होत आहे, असं मुद्दा यावेळी अजित पवारांसमोर उपस्थित करण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “आता प्रत्येक राज्यात कुणाचं ना कुणाचं होमपिच असणारच ना. तसं ते काही त्यांचं होमपिच नाही. हे विदर्भातील होमपिच आहे. आम्ही राज्याच्या वतीने तिथे सभा घेतोय. महाविकास आघाडीचे नेते तिथे बोलणार आहेत. जसं त्यांचं होमपिच आहे, तसं अनिल देशमुखांचं होमपिच आहे. तसं सुनील केदारांचं होमपिच आहे. नितीन राऊतांचं होमपिच आहे. अनेक मान्यवरांचं होमपिच आहे. “

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT