शरद पवारांना धमकी! अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला कॉल, पण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit Pawar called to eknath shinde and devendra fadnavis after sharad pawar gets death threat
ajit Pawar called to eknath shinde and devendra fadnavis after sharad pawar gets death threat
social share
google news

Sharad Pawar Get death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ‘तुमचा दाभोळकर होणार’, अशी धमकी देणार ट्विट केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी मुंबईतील लोकमान्य मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

ADVERTISEMENT

अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते.त्यावेळी त्यांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले की, “ते कुणाचे अकाऊंट आहे, याबद्दल आम्ही त्याबाबत माहिती घेतली असून सौरभ पिंपलकर याच्या अकाऊंटवरून ट्विट केले आहे. तो भाजप कार्यकर्ता असल्याची माहिती अकाऊंटवरून समोर आली आहे.”

“विचारांची लढाई विचाराने लढूया, एखाद्या नेत्याबद्दल असे लिहायचे अधिकार कुणी दिले? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी. सौरभचा मास्टर माईंड कोण आहे. हे तपास यंत्रणांनी समोर आणले पाहिजे. पक्ष वाढीचा जरूर प्रयत्न करावा. पण इतर नेत्यांची बदनामी करायची हे जे काही प्रकार वाढीला लागले आहेत.मी त्या घटनेचा निषेध करतो”, असं अजित पवार म्हणाले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> “संजय राऊत आणि तुला गोळ्या घालणार, एका महिन्यात स्मशानात पाठवणार”

पुढे अजित पवार म्हणाले, “या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकारने दखल घ्यावी”, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

चुकीची बातमी दिल्याचा मुद्दा, अजित पवार काय म्हणाले?

“अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक राजकीय नेत्यांना सोशल मीडियावरुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच शरद पवार हे औरंगाबाद म्हणणार असं एका न्यूज चॅनेलने दाखवलं. साहेब, असं कसे बोलतील? गैरसमज पसरवण्याची बातम्या कशा देतात? बातमी खरी आहे की नाही, याबाबत शहानिशा करायला शिका”, असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “तुमचा दाभोळकर करू”, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

अजित पवारांनी निलेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्याकडून केल्या जात असलेल्या विधानावरूनही कान टोचले. “गलिच्छ पद्धतीने बोलायचे काम काही राजकीय नेते करत आहेत. त्यांना समजत नाही का? वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. वैचारिक मतभेद असतील, पण कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांनी बोलू नये”, असं अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचं आवाहन

“मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की, इतरांनी चूक केली तुम्ही करू नका. ज्या कुणी चूक केली असेल, त्याला अटक झाली पाहिजे. मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करतो आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी चिखल फेक करायची गरज नाही. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. आमचे आमदार (अमोल मिटकरी) बोलले कारण त्यांनी सुरुवात केली”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT