Union Budget 2024 Live Updates: अर्थमंत्र्यांनी तिजोरी उघडली! सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये काय?
Union Budget 2024 Live: एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. तिसऱ्या सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारकडून कोणत्या घोषणा? वाचा लाईव्ह अपडेट्स
ADVERTISEMENT
union budget 2024 highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
ADVERTISEMENT
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प मांडतील. तिसऱ्या सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार? कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर हा पूर्ण अर्थसंकल्प सादर होत असून, या अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दलचे सर्व अपडेट्स वाचा... (union budget 2024 live updates)
ADVERTISEMENT
- 11:50 AM • 23 Jul 2024
budget highlights 2024: महिला आणि तरुणींसाठी ३ लाख कोटी
महिला आणि तरुणींना लाभ पोहोचवणाऱ्या योजनांसाठी ३ लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 पेक्षा अधिक शाखा सुरू केल्या जाणार आहेत.
- 11:47 AM • 23 Jul 2024
Budget 2024 Live: उत्पादन आणि सेवा क्षेत्राला ताकद
-MSME क्षेत्राला अर्थगती मंदावल्याच्या काळातही सहज कर्ज उपलब्ध होईल यासाठी एक नवीन व्यवस्था तयार केली जाणार.
-मुद्रा लोनची मर्यादा १० लाख रुपयांवरून आता २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. - 11:39 AM • 23 Jul 2024
Budget 2024 live : कमी व्याजदराने शिक्षण कर्ज
2024-25 च्या अर्थसंकल्पात २५ हजार विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करण्यासाठी मॉडेल कौशल्य कर्ज योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई व्हाऊचर दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना ३ टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाईल.
- 11:34 AM • 23 Jul 2024
Union Budget : २० लाखांपर्यंत मुद्रा कर्ज मिळणार
ज्या मुद्रा कर्ज धारकांनी पूर्वीचे कर्जाचा भरणा केला आहे. अशा लघु उद्योजकांना २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
- 11:28 AM • 23 Jul 2024
Union Budget Live : अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा?
-भारतीय अर्थव्यवस्था संतूलन राखून आहे
-गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर लक्ष
-या चार घटकांवर अर्थसंकल्पाचा सगळा फोकस असणार आहे
-रोजगार, कौशल्य विकास, मध्यमवर्गीय आणि लघू उद्योग यांवर आमचा भर
-1.48 लाख कोटींची शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी तरतूद
-शेती उत्पादन, रोजगार, सर्वसमावेशक विकास, उत्पादन आणि सेवा यावर लक्ष
-शहरी विकास, विज उत्पादन, इन्फ्रा, संशोधन यावर आमचा भर
-विकसित भारतासाठी ९ क्षेत्रांवर भर दिला जाणार
-भाजीपाला, तेलबिया आणि डाळींसाठी अर्थसंकल्पात विशेष योजना
-शेतीसाठी डिजीटल पायाभूत सुविधा उभारण्यावर भर
-शेती आणि सहाय्यक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची अर्थसंकल्पात तरतूद
-अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्य विकास हा महत्त्वाचा मुद्दा
-नवरोजगारांसाठी उत्पादन क्षेत्रात योजना, ३० लाख युवकांना फायदा
-नवरोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूद
-20 लाख युवकांना पाच वर्षांत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
-महिलांसाठी कौशल्य विकास योजना
-विद्यार्थीनींसाठी दहा लाख रुपयांपर्यंतच शिक्षणासाठी कर्ज,शैक्षणिक कर्जासाठी ई - व्हाऊचर
-आंध्रप्रदेशसाठी विशेष तरतूद, १५ हजार कोटींची तरतूद - 11:19 AM • 23 Jul 2024
Union Budget Live : सरकारचा प्राधान्यक्रम
-कृषी
-रोजगार
-सामाजिक न्याय
-सेवा
-शहरांचा विकास
-ऊर्जा सुरक्षा
-संशोधन आणि विकास
-पुढील पिढीसाठी सुधारणा - 11:17 AM • 23 Jul 2024
Union Budget 2024 Live : रोजगारनिर्मितीसाठी पाच योजना आणणार -अर्थमंत्री
4.1 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पाच योजना आणणार. पुढील पाच वर्षात दोन लाख कोटी रुपये खर्च करणार, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
- 11:11 AM • 23 Jul 2024
Budget live : अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले आहे. तिसऱ्यांदा जनतेने आमच्या सरकारला निवडून दिल्याचे त्या सुरुवातीला म्हणाल्या.
- 09:19 AM • 23 Jul 2024
Budget 2024 Live: निर्मला सीतारामन अर्थ मंत्र्यालयात दाखल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. सकाळी ११ वाजता त्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
- 08:30 AM • 23 Jul 2024
Budget Live 2024: अर्थसंकल्प कुठे बघता येणार?
अर्थसंकल्प मुंबई तकच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला बघता येईल. त्याचबरोबर संसद टीव्ही, दूरदर्शन, डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल या चॅनेलवर तुम्हाला बघता येईल.
अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषणही तुम्हाला वाचता येईल. संपूर्ण अर्थसंकल्प तुम्ही www.indiabudget.gov.in या वेबसाईटवरून हिंदी आणि इंग्रजी भाषेत डाऊनलोड करू शकता.
- 08:17 AM • 23 Jul 2024
Union budget 2024 live Updates: निर्मला सीतारामन कधी मांडणार अर्थसंकल्प?
सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या एनडीए सरकारकडून दिलासा मिळण्याच्या आशा आहेत. दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जातो. पण, लोकसभा निवडणुकीमुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
आता पूर्ण अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT