Video : मुलीचा मृत वडिलांच्या फोटोसोबत Dog फिल्टर, सोशल मीडियावर गदारोळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

viral video girl take selfi with father frame use live filter viral video in social media
viral video girl take selfi with father frame use live filter viral video in social media
social share
google news

Viral Video : सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याचा कहर झाला आहे. कुणीही कोणताही व्हिडिओ शेअर करत असते. कुणी एखाद्या मृत व्यक्तीच्या अंतिम यात्रेचा, तर कुणी घरात असलेल्या दुखवट्याचा व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर संवेदनशीलता उरली आहे की नाही असा सवाल उपस्थित होत असतो. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक मुलगी तिच्या मृत वडिलांच्या फोटोसोबत फिल्टर सेल्फी काढताना दिसली आहे. या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (viral video girl take selfie with father frame use live filter viral video in social media)

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरूणी तिच्या मृत वडिलांच्या फोटोसोबत फिल्टर सेल्फी घेते आहे. फिल्टर सेल्फी हा तो प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणताही फिल्टर वापरून फोटो काढू शकता. या व्हिडिओत तरूणीने तिच्या मृत वडिलांसोबत फिल्टर सेल्फी घेतला आहे.

हे ही वाचा : Rajasthan: ‘तात्काळ Non Veg चे ठेले बंद करा’, निवडणूक जिंकताच भाजप आमदाराचा अधिकाऱ्याला फोन

व्हिडिओत तरूणीने तिच्या मृत वडिलांचा फोटो कॅमेरात कैद केला आहे. या कॅमेरात मुलगी देखील आहे. यावेळी ही मुलगी डॉग फिल्टरचा वापर करते. ज्यामुळे फोटोतल्या व्यक्तींमध्ये लांब जीभ, कान आणि नाक येतात. असा फिल्टर फोटो काढतानाचा व्हिडिओ तिने व्हायरल केला आहे. या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

हे वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Comedy Nation (@comedynation.teb)

या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी तुफान कमेंट करतायत. एका य़ुझरने लिहले की, ये तो मोय मोय हो गया असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहले की, मित्रांनो सर्व काही वापरा, या पिढीसाठी काहीही सोडू नका. तिसरा युझर या व्हिडिओवर म्हणतो की, हा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट व्हिडिओ होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Bhavani Revanna : ‘जीव द्यायचा तर बस खाली जाऊन मर ना’, माजी पंतप्रधानांची सून कोणाला असं म्हणाली?

काही नेटकऱ्यांनी मुलीला ट्रोल केले आहे, तर काही तिच्या समर्थनार्थ ही उतरले आहेत. मला यात काही चुकीचे वाटत नाही,असे एका युझरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युझरने लिहले की, ती तिच्या वडिलांची आठवण येते आहे. तर तिसऱ्या युझरने लिहले की, मुलगी तिच्या वडिलांसोबत केलेल्या मस्तीची आठवण येत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT