वहिनीला हवे होते दिरासोबत सतत अनैतिक संबंध, बाईने पतीला दिला शॉक अन्...

मुंबई तक

दिल्लीमधून आपल्या दिराच्या प्रेमात पडलेल्या महिलेने आधी पतीच्या जेवणात 20 ते 25 गोळ्या मिसळल्या आणि नंतर प्रियकराच्या साथीने त्याला करंट देऊन त्याची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिराच्या प्रेमापोटी केली हतीची हत्या

point

आधी जेवणात झोपेच्या गोळ्या अन् नंतर करंट देऊन...

Crime News: दिल्लीमध्ये विवाहबाह्य संबंधांतून सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या दिराच्या प्रेमात पडलेल्या महिलेने आधी पतीच्या जेवणात 20 ते 25 गोळ्या मिसळल्या आणि नंतर प्रियकराच्या साथीने त्याला करंट देऊन त्याची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

35 वर्षीय करण देव आपली पत्नी सुष्मिता देव आणि त्यांच्या 6 वर्षांच्या मुलासोबत उत्तम नगरमधील ओम विहार फेस-1 मध्ये राहत होते. करण आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा पुरवण्यासाठी अगदी जबाबदारीने दिवस-रात्र मेहनत करायचे. त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील आणि लहान भाऊ कुणालचा देखील समावेश होता. गेल्या रविवारी सकाळी सुष्मिताने करणच्या आई-वडिलांना आणि लहान भावाला फोनवरून कळवले की करणला विजेचा धक्का बसला आहे आणि तो बेशुद्ध पडला आहे. हे ऐकताच कुटुंबियांनी तातडीने घरी धाव घेतली आणि त्यांनी करणला जवळच्या मॅग्गो रुग्णालयात नेले.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी करणची तपासणी केली मात्र, त्यावेळी करणला मृत घोषित करण्यात आलं. प्राथमिक तपासात डॉक्टरांनी करंट लागल्यामुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. परंतु, हे प्रकरण संशयास्पद जाणवल्याने उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. नंतर पोलिसांनी करणचा मृतदेह दीनदयाल रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. 

दिराच्या चॅट्सवरून मोठा खुलासा

पोलिस तपासादरम्यान, सुष्मिता, तिचा चुलत दिर राहुल देव आणि राहुलचे वडील पोस्टमॉर्टमसाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसून आलं. त्यांच्या या पोलिसांना कृत्यामुळे करणच्या कुटुंबियांवर संशय झाला. एके दिवशी राहुलने कोणत्या तरी कामासाठी कुणालला त्याचा मोबाईल दिला. त्यावेळी मोबाईलमध्ये कुणालने सुष्मिता आणि राहुलचे चॅट्स पाहिले. यामुळे हत्येमागचा संपूर्ण कट उघडकीस आला. 

हे ही वाचा: सुनेकडे प्रचंड वासनेने पाहणाऱ्या सासऱ्याने स्वत:च्याच मुलाला 'असं' संपवलं, समोर आली Inside Story

चॅट्समध्ये नेमकं काय लिहिलं होतं? 

सुष्मिता आणि राहुलच्या चॅटमध्ये त्या रात्री घडलेल्या घटनेबद्दल बोलणं झाल्याचं दिसून आलं. त्या दोघांनी मिळून करणच्या हत्येचा कट रचला होता. सुष्मिता आणि राहुल मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंधांत असल्याचं चॅटमधून उघड झालं. चॅटमध्ये लिहिलं होतं की "करणला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत, 4 वाजेपर्यंत तो मरून जाईल. नंतर आपण त्याला करंट देऊया, तुम्ही 3 वाजेपर्यंत या." दोघांना एकत्र राहता यावं आणि करणच्या संपत्तीवर ताबा मिळवता यावा, यासाठी सुष्मिता आणि राहुलने करणचा काटा काढण्याचं ठरवलं आणि नियोजित पद्धतीने त्याची हत्या केली. उघडकीस आलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कुणालने या प्रकरणाबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर उत्तम नगर पोलिसांनी सुष्मिता आणि राहुलला ताब्यात घेतलं आहे. 

हे ही वाचा: धावत्या ट्रेनमधून महिलेला मारला धक्का, जागीच मृत्यू... अनोळखी माणसाच्या कृत्याने ठाणे हादरलं!

दोन वर्षांपासून दिर आणि वहिनीचे प्रेमसंबंध

पोलीस चौकशीदरम्यान राहुल आणि सुष्मिताचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. करणला याबद्दल काहीच माहिती नव्हती. सुष्मिता आणि राहुल यांनी करणला मारण्याची योजना आखली आणि विजेच्या धक्क्याने अपघात झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. हत्येनंतर सुष्मिताने कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी खोटं बोलून करणला विजेचा करंट लागल्याचं सांगितले. यावरून तिच्यावर कोणताच संशय येणार नाही, याची पूर्ण खबरदारी सुष्मिताने घेतली होती. पोलिसांच्या मते, सुष्मिता आणि राहुल यांनी करणची संपत्ती ताब्यात घेण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले. राहुलचे वडीलही या कटात सामील असल्याचं समोर आलं. ते सत्य बाहेर येऊ नये, यासाठी पोस्टमॉर्टम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp