Satara : माहेरी आली अन् 2 वर्षाच्या लेकीसह कृष्णा नदीत घेतली उडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

कृष्णा नदीमध्ये उडी घेऊन विवाहितेने आत्महत्या केली.
सातारा जिल्ह्यातील वडूथमध्ये विवाहितेने मुलीसह आत्महत्या केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा जिल्ह्यात विवाहितेने नदीपात्रात घेतली उडी

point

दोन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला

point

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Satara News in Marathi : माहेरी आलेल्या विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याने साताऱ्या जिल्ह्यातील वडूथमध्ये खळबळ उडाली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. विवाहितेने पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. (Woman committed suicide with her daughter in satara)

ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याच नदीपात्रात उडी घेत महिलेने आत्महत्या केली.

हेही वाचा >> ऑफिसला गेलेल्या यशश्रीचा मृतदेहच सापडला! चेहरा, गुप्तांगावर... 

वडूथ गावाच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलावरून एका विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन उडी मारून आत्महत्या केली आहे. 

हे वाचलं का?

संचिता अक्षय साळुंखे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहिता ही वडूथ येथे आपल्या माहेरी आली होती.

हेही वाचा >> मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story 

या घटनेत दोन वर्षीय अक्षिताचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात सापडला असून, संचिता साळुंखे यांचा मृतदेह शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.

ADVERTISEMENT

आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT