काल ट्रस्टींना चपलेनं चोपलं.. आज एका झटक्यात निर्णय, संत बाळूमामा देवस्थानात काय घडतंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Admapur Balumama Mandir kolhapur
Admapur Balumama Mandir kolhapur
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

ADVERTISEMENT

Adamapur Balumama temple: कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्हातील आदमापूर इथल्या सद्गुरु श्री संत बाळूमामा (Balumama) देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदावरून सोमवारी (3 मार्च) कोल्हापुरात हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर आज (4 मार्च) तातडीने देवस्थानमध्ये उर्वरित 12 पैकी 10 विश्वस्तांची बैठक झाली. यामध्ये कर्नाटक बागलकोट जिल्ह्यातील लिंगापूर इथल्या पुंडलिक होसमणी यांची कार्याध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आल्याचं सरपंच विजय गुरव यांनी सांगितलं. आज 11 सदस्यांची सभा झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. (yesterday trustees were beaten up on road today a snap decision what is happening in Balumama devesathan)

कसं झालं बाळूमामा देवस्थान?

कोल्हापूर जिल्हातील आदमापुर इथले संत सद्गुरू श्री बाळूमामा यांनी 1966 साली समाधी घेतली होती. सद्गुरु बाळूमामा यांचं महाराष्ट्र- कर्नाटक राज्यात अनेकदा वास्तव्य असायचं. त्यांची मेंढरं-बकरे घेऊन ते या दोन्ही राज्यातील ठराविक लोकांच्या शेतात राहत होते. त्यांच्या समाधी विधीनंतर याच दोन्ही राज्यातील निवडक घराण्याची मंडळी एकत्र आली. त्यांनी 2003 साली सद्गुरु श्री. बाळूमामा देवालय महाराष्ट्र-कर्नाटक ट्रस्टची उभारणी केली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा- सुप्रसिद्ध संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टींना कोल्हापुरात भर रस्त्यात चपलेने मारहाण, काय घडलं?

या ट्रस्टची कोल्हापुरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद करण्यात आली. त्यानंतर या ठराविक घराण्यातील लोकंच विश्वस्त म्हणून सर्व काम पाहत आहेत. गेल्या वर्षात या विश्वास्तांपैकी राजाराम बापूसो मगदूम यांचे निधन झाले, तसंच ते कार्याध्यक्षही होते. त्यामुळे कार्याध्यक्ष हे पदही रिक्त होते. याच जागेवर देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले हे काम पाहत होते.

रस्त्यात हाणामारीनंतर एका झटक्यात कार्याध्यक्षपदाचा निर्णय

मात्र, त्यांनी गैर प्रोसिडिंगद्वारे स्वतःलाच कार्याध्यक्ष घोषीत केलं. अशा पद्धतीच्या नोटीसा इतर विश्वस्तांना देखील त्यांनी पाठवल्या होत्या. त्यावर वकिलांचा सल्ला घेण्यासाठी सोमवारी ही मंडळी कोल्हापुरातील प्रतिभानगर इथं आली होती. चर्चेदरम्यान त्यांच्यात वादावादी झाली. त्यातूनच मानद अध्यक्ष भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरपंच विजय गुरव यांना चपलेने बेदम मारहाण केली होती. या दरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा- लग्नासाठी मुलगी बघायला आलेला तरूण, होणाऱ्या सासूलाच नेलं पळवून!

दरम्यान, या घटनेनंतर आज तात्काळ सद्गुरु संत बाळूमामा देवालयाच्या कार्याध्यक्षपदी पुंडलिक होसमणी यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. आज सकाळी देवस्थानमध्ये 12 पैकी 10 विश्वस्तांची बैठक झाली. त्यामध्ये सर्वानुमते पुंडलिक होसमनी यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. असं असलं तरी या वादावर अद्याप पडला पडलेला नाही. त्यामुळे आदमापूर ग्रामस्थ आणि इतर विश्वस्तांच्या भूमिकेकडे बाळूमामाच्या भक्तांचे डोळे लागले आहेत.

ADVERTISEMENT

बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांना भररस्त्यात झालेली मारहाण

अदमापूर गावचे सरपंच विजय गुरव यांना भररस्त्यात मारहाण करण्यात आली. त्यानंतर मुंबई Tak शी बोलताना विजय गुरव यांनी आपली बाजू मांडली होती.

‘आदमापूर इथल्या बाळूमामा ट्रस्टमध्ये कार्याध्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर त्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. 11 सदस्य एका बाजूला आणि ज्यांना कार्याध्यक्ष पद हवं आहे अशा लोकांमध्ये वाद झाला. बाळूमामा संस्थेचा मी विश्वस्त आहे. तसंच मी आदमापूर गावचा सरपंच देखील आहे. या देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मुगदूम यांचे एक महिन्यापूर्वी दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर उर्वरित 12 पैकी 11 विश्वस्तांनी मिळून कार्याध्यक्ष निवडीसाठी वकिलाच्या कार्यालयात आले होते.’

हे ही वाचा- तरुणीसोबत लॉजमध्ये गेला व्यापारी, नंतर रुममध्ये मृतदेहच मिळाला… नेमकं काय घडलं?

‘मात्र, या ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी आपण स्वत: कार्याध्यक्ष झालेलो आहोत अशा स्वरुपाच्या नोटीस पाठवल्या. त्याचसाठी आम्ही आलेलो असताना त्यांनी पाठलाग करून त्यांच्या गुंडांकरवी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. मला कार्याध्यक्ष होऊ देत नाही का.. तू आता ठारच मारतो.. अशी धमकी त्यांनी मला यावेळी दिली.’असे आरोप सरपंच विजय गुरव यांनी केले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT