Uddhav Thackeray : ठाकरेंना धक्का! पक्ष फुटला आता पक्ष कार्यालयही गेलं!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Office। Nagpur Political News : ठाकरेंची (Uddhav Thackeray) सत्ता गेली, शिवसेनाही (Shiv Sena) ताब्यात राहते की नाही, अशी परिस्थिती असतानाच आता नवा धक्का बसलाय. सत्तेसोबत पक्ष कार्यालयही (Party Office) ठाकरेंच्या ताब्यातून सुटलंय. पण या सगळ्यांमध्ये खास गोष्ट आहे, ती म्हणजे यात एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) काहीएक संबंध नाही. मग नेमकं काय घडलंय? ठाकरेंवर अशी वाईट परिस्थिती का ओढावलीय? ठाकरेंना पक्ष कार्यालय का रिकामं करावं लागलं? समजून घ्या प्रकरण काय आहे? (Uddhav Thackeray led Shiv Sena not paid rent of party office of nagpur)

गेल्या सात महिन्यांपासून ठाकरेंवर एकापाठोपाठ एक संकट येत आहेत. सात महिन्यांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व अशी उभी फूट पडली. त्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाकडे आलेलं मुख्यमंत्रीपद गेलं. आमदारांपाठोपाठ खासदारांनीही साथ सोडली. जी शिवसेना ठाकरेंची म्हणून ओळखली जायची, ती कोणाची असा वाद निर्माण झालाय. एवढं कमी म्हणून की काय आता ठाकरे गटावर पक्षाचं कार्यालयचं सोडण्याची वेळ आलीय.

ठाकरेंच्या शिवसेनेला जागा का करावी लागली रिकामी?

त्याचं झालं असं, की नागपूर ठाकरे गटाचं गणेशपेठ इथं कार्यालय आहे. इथूनच स्थानिक उमेदवारांना एबीफॉर्मचं वाटप केलं जायचं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आल्यावर या कार्यालयात गेले होते. पण तेच कार्यालय सोडण्याची नामुष्की ठाकरे गटावर ओढावलीय. वर्षभराचं भाडं आणि वीजबिल थकल्याने जागा मालक किशोर राय यांनी ठाकरे गटाला कार्यालय रिकामं करायला लावलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP कुणाच्या पाठिशी? काय ठरलं?

2014 मध्ये सतीश हरडे जिल्हा प्रमुख असताना हे शिवसेना भवन कार्यालय भाड्याने घेण्यात आलं. प्रतिमहिना 20 हजार रुपये भाडं आणि इलेक्ट्रिक बिल सेनेला भरायचं होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून भाडं थकलं. अडीच लाखाहून जास्त भाडं आणि 1 लाखापेक्षा अधिक वीजबिल थकल्याने घर मालकाने थेट कार्यालयच रिकामं करून घेतलं.

खासदार, आमदार शिंदेंच्या गटात : शिवसेनेची आर्थिक कोंडी

शिवसेनेतल्या फाटाफुटीनं ठाकरे गटाची मोठी आर्थिक कोंडी झालीय. विदर्भात पक्षाला त्याचा मोठा फटका बसतोय. नागपूरमधील शिवसेनेचे एकमेव खासदार कृपाल तुमानेंनी शिंदे गटात प्रवेश केलाय. तसंच शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैस्वालही शिंदे गटात गेलेत.

ADVERTISEMENT

नागपूरचेच विधान परिषद आमदार दुष्यंत चतुर्वेदी ठाकरे गटात आहेत. पण सध्याच्या घडामोडीत ते नावापुरतेच उरल्याचं म्हटलं जातंय. विदर्भात पाळंमुळं असलेल्या ठाकरेंसोबत केवळ नितीन देशमुख हे एकमेव आमदार खंबीरपणे उभे राहिलेत. तेही सध्या आर्थिक प्रकरणामुळे एसीबीच्या रडारवर आलेत.

NDAला धक्का बसेल, India Today सर्व्हेवर CM शिंदे म्हणाले, कोणाला…

ADVERTISEMENT

फाटाफुटीमुळे ठाकरे गटाची राज्यभरात मोठी आर्थिक कोंडी झालीय. ठाकरे गटाकडून देशातला सर्वांत मोठा, सर्वांत श्रीमंत पक्ष असलेल्या भाजपशी दोन हात करण्याचे इशारे दिले जात आहेत. तर दुसरीकडे पक्षाला महिन्याची बिलंही भरता येत नसल्याची परिस्थिती आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT