Uddhav Thackeray: शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंची गर्जना, म्हणाले, लवकरच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray Thane Speech : शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतृत्वाविरोधात दंड थोपटत आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात (Thane) आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) बंडानंतर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. राजन विचारे (Rajan Vicahre) यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. यावेळी ठाकरेंनी संजय राऊतांनी (Sanjay Raut) दाखवलेल्या व्हिडीओचा किस्साही ठाण्यातील शिवसैनिकांना (Shiv Sainik) ऐकवला. (Uddhav Thackeray Slams Eknath shinde and leaders of balasahebanchi shiv Sena)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांच्या शिवसेनेतील नेत्यांवर हल्ला चढवला.

ठाण्यातल्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाषण करायला उभा नाहीये, पण लवकरच भाषण करायला ठाण्यात येणार. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलोय, काही दिवसांनी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे. सध्या जो काही विकृत, गलिच्छपणा राजकारणात आलेला आहे. तो समोर दिसत असतानादेखील शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाहीये, याचा मला अभिमान आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Prakash Ambedkar : राष्ट्रवादी दुखावली, ‘मविआ’त ठिणगी! ठाकरेंसमोर संकट

’50 खोके, एकदम ओके’, संजय राऊतांनी दाखवला काश्मिरातील व्हिडीओ -उद्धव ठाकरे

“अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहेच, पण त्याचबरोबर शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलं की, 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण. आज अस्सल निष्ठावंत शिवसैनिक इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते, ते विकले गेलेत. काय भावाने विकले, ते तुम्हाला माहितीये. ते मी सांगण्याची गरज नाही. (यावेळी उपस्थितांनी ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या.)”, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांवर हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

या घोषणांच्या संदर्भाने उद्धव ठाकरेंनी काश्मिरातील किस्सा शिवसैनिकांना सांगितला. ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत संजय राऊत काश्मिरात गेले होते. आल्यानंतर संजय राऊतांनी मला व्हिडीओ दाखवला. काश्मिरात सुद्धा या (50 खोके एकदम ओके) घोषणा आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा गेल्या आहेत.”

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : ‘सत्ता उलथवून…’; मोदींवर तोफ, शिवसेनेची जनतेला साद

“यामध्ये महाराष्ट्राची बदनामी झालीये. महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते, ते विकले गेले. ही नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामीच झालेली आहे. गेले ते जाऊद्या… त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात अर्थ नाहीये. मी लवकरात लवकर ठाण्यात एक प्रचंड मोठी जाहीरसभा घेणार. त्यावेळी कुणाचा काय समाचार घ्यायचा तो घेईन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ठाण्यात जाहीरसभा घेण्याची घोषणा केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT