NEET पेपर लीक: पोरानेच केला मोटेगावकरचा गेम? पाहा CBI ला नेमकं काय सांगितलं

मुंबई तक

CBI च्या तपासात मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतः NEET परीक्षा दिली होती. त्यामुळे पेपर लीक प्रकरणी त्याने आता काही महत्त्वाचे खुलासे सीबीआय समोर केले आहेत.

ADVERTISEMENT

google news

मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी पेपर फोडला, स्वत: च्या मुलाचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बनवता यावं म्हणून परीक्षा यंत्रणेत फेरफार केला अशा चर्चा लातूरच्या एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाला अटक केल्यानंतर सुरु झाल्या. मात्र या प्रकरणात आता एक वेगळाच टर्न येणार आहे. कारण कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाचा मुलगाच आता या सगळ्या प्रकरणाचा मुख्य साक्षीदार बनू शकतो. सीबीआयच्या चौकशीत या अल्पवयीन मुलाने असा काही गौप्यस्फोट केलाय, ज्यामुळे शिक्षण क्षेत्र हादरून गेलं आहे.

NEET-UG 2026 परीक्षा (3 मे 2026) च्या पेपरमध्ये काही भाग आधीच लीक झाल्याचे आरोप आहेत. CBI च्या तपासात NTA (National Testing Agency) शी संबंधित व्यक्ती, रिटायर्ड प्रोफेसर आणि कोचिंगवाल्यांचा सहभाग समोर आला. मुख्य आरोपींमध्ये रिटायर्ड केमिस्ट्री प्रोफेसर पी. व्ही. कुलकर्णी (NTA शी संबंधित), मनिषा मांढरे, मनिषा हवालदार इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी-झूलॉजीचे प्रश्न लीक केल्याचे आरोप आहेत.

CBI च्या तपासात मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाने (ज्याने स्वतः NEET परीक्षा दिली होती) महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्याने कबूल केल्याप्रमाणे, त्याच्या वडिलांनी परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा पूर्ण लीक पेपर मिळवून दिला होता.असा जबाब दिल्याचं समजतंय.