Pune Rain News : पुण्यात पावसाचा हाहाकार, डोंगरमाथ्यावरील पाणी घरांत... रस्त्यांवर पाणीच पाणी...
पुण्यातील तुफान पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून घरात पाणी शिरले आहे. प्रशासन सतर्क असून, नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
पुण्यातील तुफान पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून घरात पाणी शिरले आहे. प्रशासन सतर्क असून, नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. तुफान पावसामुळे रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलंय. डोंगरमाथ्यावरील पाणी अनेक घरांमध्ये शिरलं आहे. हवामान विभागानं आज पुणे आणि पिंपरी चिंचवडला यलो अलर्ट दिलाय. मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. डोंगरमाथ्यावरून आलेलं पाणी रस्त्यांवर पसरल्यानं वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक वाहनं पाण्यात अडकली आहेत. घरात पाणी शिरल्यानं लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या परिस्थितीत शहरामध्ये पाणी उपसण्याचे पंप कार्यान्वित केले गेले आहेत. शहरातील निचचांकी भागात विशेष कायदे लागू करण्यात आले आहेत. प्रशासन पूर्णतः सतर्क असून, सगळ्या नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT