'पाच जीव गेले, आता तरी प्रशासन जागं होणार का?'; संतप्त डोंबिवलीकरांचा सवाल

टोलेजंग इमारतींना मुबलक पाणी पुरवठा, मात्र गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाणी वितरण व्यवस्थेवर प्रशचिन्ह
'पाच जीव गेले, आता तरी प्रशासन जागं होणार का?'; संतप्त डोंबिवलीकरांचा सवाल
Water scarcity claimed five lives. Will the administration wake up now? Question of angry Dombivalikars

-मिथिलेश गुप्ता,ठाणे

घरात पाणी नाही, पाणी येतं ते पण पिण्यापुरतं... कसे बसे तहान भागवण्यासाठी हंडा कळशी भरली जाते... कपडे धुण्यासाठी ग्रामस्थांना आजूबाजूच्या खदानीत साठलेल्या पाण्याचा आसरा घ्यावा लागतोय, ही परिस्थिती आहे शहरी भागातील डोंबिवली जवळच असलेल्या गावांची... शनिवारी सायंकाळच्या सुमारास एक डोंबिवली संदप गावातील खदानी मध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. याआधी देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.

Water scarcity claimed five lives. Will the administration wake up now? Question of angry Dombivalikars
डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना! पाणीटंचाईने घेतले एकाच कुटुंबातील पाच जणांचे प्राण

पाणी टंचाईमुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थ या खदानीचा आसरा घेतात पाणी समस्येबाबत अनेकदा ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात आला निवेदने देण्यात आली आंदोलन करण्यात आले मात्र अद्यापही या गावांचे पाणी समस्या सुटलेली नाही शनिवारच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का असा सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जातोय.

घोटभर पाण्यासाठी नागरिकाचा संघर्ष सुरु...

पाणी टंचाईने ग्रासलेले नागरिक जीव मुठीत घेऊन पाणी मिळविण्यासाठी धडपडत आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भेडसावत असून घोटभर पाण्यासाठी नागरिकाचा संघर्ष सुरु आहे. नांदिवली, देसलेपाडा, भोपर भागात तीव्र पाणी टंचाई आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी रहिवाशांना खदानी, विहिरीवर जावे लागते. या पाणी टंचाईतून पाच जणांचे जीव गेले आहेत.

सर्वसामन्यांच्या जीवनातील संघर्ष बघायला कोणालाही वेळ आहे का ?

महाराष्ट्राचा विचार केला, तर एकीकडे खुर्चीवरून राजकारण सुरू आहे. कोण कोणाला काय म्हणाला आणि त्या नेत्याला आम्ही काय आणि कसे उत्तर द्यायचे? ही व्यूहरचना आखण्यात सर्वच पक्ष सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे सामन्यांच्या जीवनातील संघर्ष बघायला कोणालाही वेळ नाही. कोणाला खुर्चीवर पुन्हा पुन्हा यायचं आहे, तर कोणाला अजान आणि हनुमान चालीसा याच्या आवाजावरून महाराष्ट्राची शांती भंग करायची आहे. कोणाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री कायम बसवायचा आहे. तर कोणाला स्वतःच्या ध्येय धोरणानुसार आपल्याच तालावर इतर पक्षांना नाचवायचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस मात्र भरडला जातो आहे.

पिण्याचे पाणी काही मिनिटांसाठी येते...

डोंबिवली जवळ असलेल्या संदप ,भोपर ,नांदीवली ,देसले पाडा सह आस पासच्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे .या भागाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. कल्याण डोंबिवली महापालिका पाण्याचं नियोजन करते मात्र कमी दाबाने, अपुऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेत. पिण्याचे पाणी काही मिनिटं करता येते. त्यामुळे इतर काम तर लांबच राहिले कपडे धुण्या करता या गावातील महिला जीव धोक्यात घालून या गावच्या आजूबाजूच्या खदानी मधील पाण्याचा आसरा घेतात.

Water scarcity claimed five lives. Will the administration wake up now? Question of angry Dombivalikars
'डोंबिवली किती बदललं', जुन्या आठवणींमध्ये रमला मराठमोळा अजिंक्य रहाणे

स्मार्ट सिटी केवळ कागदावरच....

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला. मात्र, इंडिया खरंच डिजिटल होत आहे का ? आणि डिजिटल इंडियामुळे लोकांना मूलभूत सुविधा मिळणार आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटीच्या यादीतील शहर आहे. मात्र, स्मार्ट सिटी केवळ कागदावरच असून या शहरातील राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणाच्या जिवापेक्षा काहीच मोठं नसल्याची जाणीव प्रशासन, अधिकारी, राजकारणी आणि सरकार यांना कोणालाच नाही, हीच कदाचित अधोगतीची वाटचाल असावी ?

डोंबिवलीतल्या या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाकडून ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली जातात मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. या गावांसाठी सुरू असलेल्या पाणी योजनेचं काम ही संथ गतीने सुरू आहे. नागरिक आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रशासनाला अजून किती बळी हवेत असा सवाल येथील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला.

Water scarcity claimed five lives. Will the administration wake up now? Question of angry Dombivalikars
तुम्हीही दररोज ८ ग्लास पाणी पित नाही?; होऊ शकतो गंभीर आजार

ठाणे जिल्हा हा संपूर्ण मुंबईची तहान भागविणारा जिल्हा आहे. बारवी, तानसा, भातसा, मध्य वैतरणा यासारखी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधली गेली. त्यानंतर संपूर्ण मुंबई या धरणातून आलेले पाणी पीत असली तरी ठाणे जिल्हा मात्र अद्यापही पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वतःचा धरण असावा अशी मागणी गेले अनेक वर्षांपासून केली जात आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

या गावातील पाईपलाईन हे बीस वर्ष जुने आहेत, नवीन पाईपलाईनच्या काम संथ गतीने सुरू आहे, इथे टँकर माफिया मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करते. त्यामुळे या गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केले जाते का ? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहे.

येथील पाइपलाइन खूप जुन्या आहेत, ती पाईपलाईन आता जीर्ण झाली आहे. नवीन पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यावेळच्या लोकसंख्येनुसार पाइपलाइन टाकण्यात आली होती. पण आजची लोकसंख्या 10 पटींनी वाढली आहे. दोन ते तीन दिवसानंतर पाणी मिळत असून जुन्या पाईपलाईनमधून सर्वाना पाणी मिळणे अवघड आहे.

डोंबिवली अनेक भागात पाणीटंचाई ही मोठी समस्या आहे, येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, त्यामुळे हा भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे..या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे, त्या टोलेजंग इमारतींना मुबलक पाणी पुरवठा आहे, मात्र गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाणी वितरण व्यवस्थेवर प्रशचिन्ह निर्माण होत आहे.

काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर पाण्यासाठी हजारो नागरिकांनी मोर्चा काढला होता, यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे उपस्थित न होते, तेव्हा अवार्ड घेण्यासाठी दुसऱ्या शहरात गेले होते.डोंबिवली शहर हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्रास होणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या इमारतींना पाणीपुरवठा सहज उपलब्ध होतो. मात्र वर्षानुवर्ष आजूबाजूला राहणारे गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत, यासारखी दुसरी शोकांतिका नाही असंच म्हणण्याची वेळ आता या ग्रामस्थांवर आली आहे.

Related Stories

No stories found.