4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत, महाराष्ट्रातून पाकिस्तान गाठलेल्या हरजिंदर रिंदाचा सहभाग उघड

हरयाणाच्या कर्नाल भागात पोलिसांनी केली कारवाई, हरजिंदरने पाकिस्तानातून शस्त्र पाठवल्याचं उघड
4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत, महाराष्ट्रातून पाकिस्तान गाठलेल्या हरजिंदर रिंदाचा सहभाग उघड

खलिस्तानी समर्थक असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना हरयाणातील कर्नाल भागातून पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रही ताब्यात घेतली असून ही शस्त्र त्यांना पाकिस्तानातून ड्रोनमार्गे पुरवण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भुपिंदर अशी या चार संशयित दहशतवाद्यांची नावं असून हे चौघेही पंजाबचे रहिवासी आहेत.

4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत, महाराष्ट्रातून पाकिस्तान गाठलेल्या हरजिंदर रिंदाचा सहभाग उघड
Patiala Violence : पतियाळात हिंसाचार का उफाळला, मास्टरमाईंड बरजिंदर सिंह परवाना कोण आहे?

पोलिसांनी या अतिरेक्यांकडून एक पिस्तुल आणि 21 जिवंत काडतूस हस्तगत केली आहे. पाकिस्तानातील फिरोजपूर जिल्ह्यातून हरजिंदर सिंग रिंदा या खलिस्तानी दहशतवाद्याने ड्रोनचा वापर करुन ही शस्त्र या दहशतवाद्यांपर्यंत पोहचवल्याचं समोर येतंय. रिंदाने मोबाईल App च्या माध्यमातून या चारही दहशतवाद्यांना ही शस्त्र पाठवली. या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पंजाब ते पाकिस्तान व्हाया महाराष्ट्र - हरजिंदर सिंग रिंदा बनला खलिस्तानी दहशतवादी

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात हरजिंदरचा जन्म झाला. वयाच्या 11 व्या वर्षी हरजिंदर आपल्या परिवारासह नांदेडला स्थायिक झाला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी हरजिंदरने घरगुती वादातून एका नातेवाईकाची हत्या केली होती.

नांदेडमध्ये हरजिंदरने खंडणी वसूल करण्याची काम सुरु करत तिकडे किमान दोन हत्या केल्या. एकेकाळी विद्यार्थी नेता म्हणून ओळख असलेला हरजिंदर रिंदा हा चंदीगढ पोलिसांना हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी हवा होता. 2016 ते 2018 या काळात रिंदाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

तपासयंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट पासपोर्टच्या आधारे हरजिंदर नेपाळमार्गे पाकिस्तानात दाखल झाला. 35 वर्षीय हरजिंदरला पाकिस्तानात ISI या गुप्तचर यंत्रणेने आपला पाठींबाही दिल्याचं कळतंय. पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुन्हा जिवंत करण्याचं काम हरजिंदरकडे देण्यात आलं आहे.

4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत, महाराष्ट्रातून पाकिस्तान गाठलेल्या हरजिंदर रिंदाचा सहभाग उघड
तीन गोळ्या आणि तंदूरच्या भट्टीत टाकला मृतदेह, कसं घडलं होतं दिल्लीतील नयना सहानी हत्याकांड?

Related Stories

No stories found.