Crime: 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, बीड जिल्हा पुन्हा हादरला

Beed Gang Rape: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटन घडली आहे. याप्रकरणी परळी पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपींना अटक केली.
a 22 year old married woman was gang raped in beed district
a 22 year old married woman was gang raped in beed district(प्रातिनिधिक फोटो)

रोहिदास हातागळे, बीड: गेल्या चार दिवसांपूर्वीचं बीड जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या मिरवट गावांमध्ये, शेतात काम करत असणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेवर, दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिरवट गावातील 22 वर्षीय पीडित महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहते. काल (27 एप्रिल) पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे (वय 40 वर्ष) रा. मिरवट व साजन तिडके (वय 30 वर्ष) रा. भोगलवाडी, या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

बलात्कारानंतर याप्रकरणी कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील आरोपींनी पीडितेला दिली.

दरम्यान, 22 वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तात्काळ पोलिसात धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात 376 (D), 323, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 तासात नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील 24 वर्षीय विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यातील महिलेवर बीडमध्ये सामूहिक बलात्कार

बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या तरुणाने अहमदनगर शहरात अत्याचार केल्याची घटना घडली होती. दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केला. तिन्ही नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यासह पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 24 वर्षीय विवाहिता आपल्या 2 लहान मुलं, नवरा आणि सासूसह पुण्यात राहते. मात्र, नवऱ्यासोबत 4 एप्रिल रोजी किरकोळ भांडण झाल्यानं, ती माहेरी बीडला आली होती. माहेरी आल्यानंतर 'तू एकटीच का आली? तू परत तुझ्या नवऱ्याकडे जा,' असं पीडितेला तिच्या आईनं सांगितलं.

त्यानंतर पीडिता बीड शहरातील आपल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली. 11 एप्रिल रोजी पीडिता रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाली. यादरम्यान पीडितेचा नात्याने चुलत पुतण्या असणारा आरोपी अजय गवते याने फोन केला. 'मला काकांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं आहे. तुम्ही अहमदनगरच्या चांदणी चौकात उतरा,' असं म्हणाला.

a 22 year old married woman was gang raped in beed district
संतापजनक घटना! बीडमध्ये सख्ख्या आणि चुलत भावाचा अल्पवयीन बहिणीवर शारीरिक अत्याचार

संभाषणानंतर पीडिता सांगितलेल्या ठिकाणी उतरली. काही वेळात आरोपी अजय तिथं आला आणि आता खूप रात्र झालीये, आपण इथल्या लॉजवर मुक्काम करू आणि उद्या निघू असं म्हणाला. त्यानंतर लॉजवर आल्यावर अजयनं ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकून दिलं आणि लॉजवर बलात्कार केला. तसेच अश्लील फोटो व्हिडिओ देखील काढले.

दुसऱ्या दिवशी नराधम आरोपी अजयने जिपमध्ये बसवून पीडितेला पुन्हा बीडला पाठवले. दरम्यान बेलुरा गावातील दत्ता गवते याचा पीडितेला फोन आला. यावेळी तो म्हणाला, 'अजयचे अश्लील व्हिडीओ माझ्याकडे आहेत, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल,' असं म्हणत त्याने पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in