पुण्यात बालविवाहाची धक्कादायक घटना! लग्न लावून देणाऱ्या आईला आणि नवऱ्याला अटक

अल्पवयीन मुलीच्या तक्रार केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांची कारवाई
A shocking incident of child marriage in Pune! Mother and husband arrested for arranging marriage
A shocking incident of child marriage in Pune! Mother and husband arrested for arranging marriage

पुण्यातील चंदननगर येथील एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या प्रियकरासोबत लावून दिला. ही मुलगी १५ वर्षांची आहे. तर त्यानंतर आरोपीने त्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी मुलीची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी सागर जयराम दातखिळे (वय २८ मूळचा राहणारा उस्मानाबाद), आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर (वय 36 राहणार वडगावशेरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर या २०१९ मध्ये मुलीला घेऊन गावी गेल्या होत्या.त्यावेळी तिथे एका लग्नामध्ये आरोपी सागर जयराम दातखिळे याच्यासोबत आरोपी आई चंद्रकला यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपी सागर हा पुण्यात अनेक वेळ वडगावशेरी येथील घरी येत होता. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.या नात्याची माहिती पीडित मुलीला झाली होती.

आईने अल्पवयीन मुलीला दिली धमकी

याच दरम्यान आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर हिने तू सागर जयराम दातखिळे याच्या सोबत लग्न न केल्यास मी जीव देईन अशी धमकी दिली.त्या भीतीपोटी १५ वर्षीय मुलीने आरोपी सागर जयराम दातखिळे याच्या सोबत १५ दिवस आधी लग्न केलं. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारा बाबत पीडित मुलीने तिच्या शाळेतील मित्राला संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली.त्यानंतर ती माहिती त्याच परिसरातील एका महिलेला त्यांनी सांगितल्यावर, त्या महिलेने पीडित मुलीला आमच्या पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आल्या. त्यावेळी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सागर जयराम दातखिळे आणि आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर या दोघा विरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती चंदननगर पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in