Igatpuri Nashik: जमिनीचा वाद जिवाशी; बचावासाठी आलेल्या २० वर्षीय युवतीची हत्या, तीन घरंही जाळली

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अधरवड येथील आदिवासी कातकरी वस्तीमध्ये शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात.
Igatpuri Nashik: जमिनीचा वाद जिवाशी; बचावासाठी आलेल्या २० वर्षीय युवतीची हत्या, तीन घरंही जाळली
Nashik IgatpuriMumbai Tak

इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील एका वस्तीत पहाटे ३ वाजेच्या सुमाराला बचाव करण्यासाठीमध्ये आलेल्या २० वर्षीय युवतीची जमावाकडून हत्या करण्यात आली. तर ३ कुटुंबाची घरे जाळून टाकल्याची घटना घडली आहे. १० ते २० लोकांचे हे टोळके बारशिंगवे गाव इगतपुरी तालुक्यातील आहे, हल्लेखोर व पीडित परिवार दोघेही आदिवासी आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक माहिती घोटी पोलीसांनी दिली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अधरवड येथील आदिवासी कातकरी वस्तीमध्ये शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा बारशिंगवे येथील व्यक्तींशी जमिनीचा वाद सुरू होता. याबाबत गेल्या काही दिवसांपासून ह्याबाबत वादविवाद सुरू होते. शुक्रवारी दुपारी या प्रकरणी बारशिंगवे भागातील ४० ते ५० जणांचे संतप्त टोळके लाठ्याकाठ्या आणि दांडके घेऊन वस्तीत आले होते. (Nashik Crime)

स्थानिक पोलीस पाटील आणि रहिवाश्यांनी यावेळी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र पहाटेच्या वेळी ह्या टोळक्याने वस्तीत प्रवेश करुन हाणामाऱ्या सुरु केल्या. यावेळी शरद वाघ यांच्यावर वार करीत असतांना पाहुणे म्हणून आलेली त्यांची मेहुणी लक्ष्मी वय २० ही मध्यस्थी करायला गेली. मात्र तिच्या वर्मी वार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ह्या टोळक्याने यावेळी शरद महादू वाघ, शंकर ज्ञानेश्वर वाघ, अलका संजू वाघ ह्या तीन कुटुंबाची घरे जाळून टाकली आणि पळून गेले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in