
Waiter Killed Cook in Baratmati Police Arrested Within Hour बारामती येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय आचाऱ्याने त्याच्या सहकाऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बारामतीमध्ये मातोश्रीमध्ये हॉटेल आहे. मातोश्री या हॉटेलमध्ये हा खुनाचा प्रकार घडला. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बारामती पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.
गणेश प्रभाकर चव्हाण ( मालेगाव जिल्हा नाशिक) असे हत्या झालेल्या वेटरचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी विकास दीपक सिंग (वय 29 राहणार मूळ चंदीगड, पंजाब) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितले की, जवळची या भागात गेल्या आठ दिवसांपूर्वी नव्याने सुरुवात झालेल्या हॉटेलमध्ये आरोपी विकास सिंग आणि मयत गणेश चव्हाण दोघेही आचाऱ्याचे काम करीत होते.
आरोपी सिंग हा रोट्या बनवण्याचे काम करीत होता तर मयत चव्हाण नॉनव्हेज भाज्या बनवायचा. गुरुवारी रात्री आरोपी सिंग याने तू नॉनव्हेज बनवतोस तर माझ्या किचन मध्ये पाय ठेवू नकोस, असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. किरकोळ वादाचे पर्यावसन भांडणात झाले. दरम्यान हॉटेल मालकाच्या मध्यस्थीने हा वाद सोडवला मात्र शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सिंग याने चव्हाण यांच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला.
या घटनेनंतर सिंग पळून जाण्याच्या असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मयत चव्हाण नाशिक जिल्ह्यातून तडीपार असून विविध गुन्ह्यात त्याचा समावेश आहे. 2018 नंतर मात्र दाखल नाही, मात्र तापट स्वभाव असल्याने त्याचा सहकार यांच्याशी वाद झाला आणि किरकोळ वादातून त्याची हत्या झाली खून प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.