Facebook वर पोस्ट शेअर करुन भाजप नेत्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Suicide Case: भाजपच्या जिल्हा पंचायतच्या सदस्या असलेल्या एका महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.
bjp leader zila panchayat member shweta singh suicide in uttar paradesh
bjp leader zila panchayat member shweta singh suicide in uttar paradesh(फाइल फोटो)

बांदा (उत्तरप्रदेश): निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची सून आणि भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या महिलेने आज (27 एप्रिल) राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.

या घटनेमागचे कारण पती-पत्नीमधील वाद आणि दुरावा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पत्नीच्या आत्महत्येनंतर पती फरार झाला असल्याचं समजतं आहे. या घटनेची माहिती मिळताच एसपी घटनास्थळी पोहोचले. तसेच स्थानिक पोलिसांनी देखील घटनेचा तपास तात्काळ सुरू केला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्यामुळे महिलेच्या मृत्यूचं कारण पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समजणार आहे. मृत्यूच्या 20 तास आधी देखील महिलेने फेसबुक पोस्टद्वारे तिच्या मनातल्या गोष्टी व्यक्त केल्या होत्या.

भाजप नेत्या श्वेता सिंह गौर या बांदा येथील जसपुरा भागातील जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी आयपीएस राजबहादूर सिंह यांच्या सून आहेत. त्यांच्याच घरात मुलगा आणि सून राहत होते. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असणाऱ्या श्वेताने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आधीच तिच्या आत्महत्येबाबत संकेत दिले होते.

श्वेता सिंग गौर ही तिचा पती दीपक सिंग गौरसोबत सासऱ्यांनी बांधलेल्या घरात राहत होत्या. पती-पत्नी हे दोघेही भाजपशी संबंधित आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून काही गोष्टींवरुन भांडण सुरू होते, काल रात्रीही या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. ज्यानंतर श्वेता सिंहने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी श्वेताने फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की, 'जखमी नागीण आणि सिंहिण आणि अपमानित महिलेने घाबरले पाहिजे.'

श्वेताच्या आत्महत्येपासून तिचा पती हा फरार झाला असून पोलीस त्याचा. श्वेता यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यासोबतच श्वेता यांचा फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

bjp leader zila panchayat member shweta singh suicide in uttar paradesh
नागपूर : जन्मदात्या आईचा खून करत इंजिनीअर मुलाची आत्महत्या

पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादामुळे त्रस्त झालेल्या श्वेता सिंह यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in