
Dharavi Gang Rape: मुंबईतल्या धारावी सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या (Dharavi Gang Rape)दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी एकटी महिला घरात आहे हे पाहून तिच्यावर चाकूच्या धाकाने बलात्कार केला होता. १४ मे रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या प्रकरणी धारावी पोलिसांनी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतल्या धारावीत (Dharavi) १९ वर्षांच्या विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपींनी घटनेचा व्हीडिओही रेकॉर्ड केला आहे असंही पीडितेने सांगितलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या भागातलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. आता आज या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
ज्यांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला ते आरोपी याच परिसरातले असतील असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. धारावीत १९ वर्षीय विवाहित महिला वास्तव्यास होती. पहाटेच्या सुमारास दोन आरोपींनी तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून या दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तोंड लपवण्यासाठी या दोघांनी त्यांचे चेहरे कापडाने झाकले होते. तसंच या घटनेचा व्हीडिओही चित्रित करण्यात आल्याचं पीडितेने सांगितलं आहे.
१९ वर्षीय महिला तिच्या घरात होती. त्याचवेळी दोन अज्ञात पुरूष तिच्या घरात आले. चाकूचा धाक दाखवून या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. तसंच या घटनेचा व्हीडिओही त्यांनी काढला असं धारावी पोलिसांनी पीडित महिलेने सांगितलं. या भागात जे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातो आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. आता या प्रकरणातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी पोलीस करत आहेत.