'सैराट'... नराधम भावाने बहिणीची केली हत्या, 'यासाठी' घेतला जीव

धुळ्यातील साक्रीमध्ये नराधम भावाने छोट्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
'सैराट'... नराधम भावाने बहिणीची केली हत्या, 'यासाठी' घेतला जीव
murder by brother on suspicion sisters love affair shocking incident in dhule

धुळे: धुळ्यातील साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. बावीस वर्षीय बहिणीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय व त्याच्यासोबत ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून तिला मारहाण करून, तिचा गळा आवळून हत्या करत रात्रीच तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करुन संशयित भावाला अटक केली आहे. मात्र, या संपूर्ण घटनेने साक्रीमध्ये एकच खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?

संदिप रमेश हालोर (वय 24 वर्ष) याने आपली बहिण पुष्पा (वय 22 वर्ष) हिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन तिला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता नराधम संदीपने दोरीने पुष्पाचा गळा आवळून तिला ठार केलं. तसंच कोणीही आपल्यावर संशय घेऊ नये यासाठी त्याने पुष्पाचा अंत्यविधी रात्रीच गुपचूप आटोपून टाकला.

दरम्यान, याबाबतची गोपनीय माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच निजामपूर पोलिसांच्या तपास पथकाने हट्टी गाव परिसरात जाऊन सर्वात आधी बातमीची खातरजमा केली. यावेळी त्यांना आरोपी संदीप हालोर हा गावातच सापडला.

murder by brother on suspicion sisters love affair shocking incident in dhule
औरंगाबाद: 'माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं', पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

सुरुवातीला पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. यावेळी आरोपी संदीपने आपणच गुन्हा केल्याची कबुली दिली. याबाबत पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, 'हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे रात्रीचे तीन वाजेचे सुमारास त्याची बहीण पुष्पा रमेश हालोर (वय 22 वर्ष) हिचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते.'

'एवढंच नव्हे तर ती पळून जाण्याच्या बेतात होती. याच गोष्टीचा राग मनात धरून तिच्या अंगावरील साडीची लेस फाडून लिंबाच्या झाडाला बांधून फास तयार केला. त्यानंतर गळफास लावून तिला जीवे ठार मारलं.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाचा जीव जाईपर्यंत त्याची संदीप हा तिथेच थांबून राहिला व त्यांनतर घरी जावून पुष्पाने स्वत:च्या हाताने गळफास घेऊन मयत झाल्याचे भासवून आई व मित्रांसह गावातील लोकांना खोटी माहिती दिली व पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार देखील केले.

अंत्यविधी करते वेळी तिचे अंगावरील सर्व कपडे तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दहनात टाकून पुरावे नष्ट केले. परंतु निजामपूर पोलिसांनी याचा संपूर्ण छडा लावत आरोपी भावाला गजाआड केले असून साक्री न्यायालयाने आता या खुणी भावाला एकोणावीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in