२५ तलवारींसह नांदेड पोलिसांनी केली दोन आरोपींना अटक

धुळ्यापाठोपाठ नांदेडमध्ये आढळल्या तलवारी
२५ तलवारींसह नांदेड पोलिसांनी केली दोन आरोपींना अटक

कुँवरचंद मंडले, प्रतिनिधी, नांदेड

नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीबी पथकाचे प्रमुख एपीआय वावडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील गोकुळनगर परिसरात आरोपी ऑटोच्या बॉक्समध्ये बंद करून तलवारी घेऊन फिरत होते. पोलिसांनी शोध मोहिमेदरम्यान ऑटो थांबवून त्याची झडती घेण्यात आली.

यानंतर पोलिसांना २५ तलवारी पकडण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तलवारी सचखंड रेल्वेने अमृतसरहून नांदेडला आणण्यात आल्या होत्या. यापूर्वी जालना, धुळे येथे पोलिसांनी शस्त्रसाठा पकडला होता, त्यानंतर आता नांदेडमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेडमध्ये तलवारी पकडण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण वाढले आहे. कारण यापूर्वीही नांदेडमध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. या तलवारी कोणी आणि कोणत्या कारणासाठी नांदेड येथे आणल्या याचा तपास सुरू आहे, आरोपीचे गुरुद्वाराच्या परिसरात दुकान असल्याची खात्री पोलीस विभागाने केली आहे.पुढील तपास सुरू आहे.अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी माध्यमांना दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in