'कल्याणच्या निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे' घोषणा देत हजारो तरूण-तरूणांचा मोर्चा

वाचा सविस्तर काय आहे प्रकरण? का निघाला एवढा मोठा मोर्चा?
'कल्याणच्या निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे' घोषणा देत हजारो तरूण-तरूणांचा मोर्चा
Rape and suicide of a minor girl in Kalyan, thousands of youths march for justice for the victim girl

कल्याणमध्ये एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. लैंगिक छळाला कंटाळून एका अल्पवयीन तरूणीने आत्महत्या केल्याची ही घटना होती. या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी कल्याण पूर्व भागात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो तरूण-तरूणींचा सहभाग होता

एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच सात मित्रांकडून दीड वर्षांपासून अत्याचार होत होते. दीड वर्षांपासून या अल्पवयीन मुलीला लैंगिक छळ सहन करावा लागत होता. मागच्या आठवड्यात या मुलीने तिचं आयुष्य संपवलं. यानंतर पोलिसांनी सात तरूणांसह एका मैत्रिणीला अटक केली. हे आठही जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. आत्महत्या केलेल्या तरूणीला न्याय मिळावा म्हणून हजारो तरूण-तरूणांनी मोर्चा काढला होता. कल्याण पूर्व भागातून हा मोर्चा कोळसेवाडी पोलीस ठाण्यातपर्यंत निघाला होता.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वेत धक्कादायक घटना घडली असून घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने ७ तरुण पीडीतेवर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांना मुलीच्या मोबाईल मध्ये सुसाईड नोट मिळाली असून कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

आरोपींमध्ये दोन तरुणीचा देखील समावेश आहे. ही आरोपी तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की आरोपीमध्ये कल्याणधील एका नामांकित बिल्डरची मुलं असून आमच्यावर दबाव टाकला जात आहे, आमच्या जीवाला धोका आहे,आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीने बारावीची परीक्षा दिली होती नुकताच तिचा निकाल ही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला ७१ टक्के पडले होते. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईल मध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

Rape and suicide of a minor girl in Kalyan, thousands of youths march for justice for the victim girl
डोंबिवली हादरली, 18 वर्षाच्या दोन तरुणांची लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्या

सुसाईड नोट मधील मजकुरामुळे पोलीसही थक्क झाले. सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमाना एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पिडीतेची मैत्रीण होती. पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. सनी पांडे, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. दरम्यान अटक आरोपी मधील काही कल्याण मधील धनदांडग्या बिल्डरचे मुलं असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in