Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / सातारा: वासनांध तरुण भररस्त्यात अचानक घालतो महिलेच्या कंबरेत हात अन्..
गुन्ह्यांची दुनिया बातम्या शहर-खबरबात

सातारा: वासनांध तरुण भररस्त्यात अचानक घालतो महिलेच्या कंबरेत हात अन्..

Satara Crime: सातारा: बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी एक तरुण थेट महिलांना पकडून त्यांना जबरदस्तीने किस (Kiss) करत असल्याची घटना उघडकीस आलेली असताना दुसरीकडे आता सातारा (Satara) शहरामध्येही असाच काहीसा किळसवाणा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्याभरात साताऱ्यात दोन अशा अनपेक्षित घटना घडल्या की, शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या (Women) मनात आता भीती निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे, अनोळखी महिलांना स्पर्श करण्यासाठी काही तरुणांचा हात निर्लज्जपणे पुढे सरसावत आहेत. वासनांध आरोपी त्याचे विकृत चाळे करण्यासाठी निर्जन ठिकाण पाहून महिलांना लक्ष्य बनवतो आहे. असाच धक्कादायक प्रकार दोन महिलांच्या बाबतीत नुकताच घडला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (satara a lustful young man suddenly puts his hand on a womans waist in a street creating fear among women)

नेमकं प्रकरण काय?

सातारा शहर तसं पाहिलं तर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं. परंतु अलिकडे शहरामध्ये सातत्याने कुठे ना कुठे तरी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. यातील दोन घटनांनी मात्र शहरातील महिलांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.

मागील आठवड्यात एक नोकरदार महिला ऑफिसमधील आपले काम आटोपून रात्री आठ वाजता एकटीच दुचाकीवरून घरी निघाली होती. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधून जात असताना एका अनोळखी विकृत व्यक्तीने पाळत ठेवून तिचा पाठलाग केला. दुचाकीस्वाराने ग्रेडसेपरेटरमधील शांतता, कमी वर्दळ पाहून अचानक दुचाकीवरूनच महिलेच्या कंबरेत हात घालून तिला गलिच्छ पद्धतीने स्पर्श केला.

अनपेक्षितरित्या घडलेल्या या घटनेने ती महिला भयभीत झाली. महिलेचा विनयभंग (molesting) केल्यानंतर वासनांध आरोपीने तिथून तात्काळ पळ काढला. अवघ्या काही क्षणातच हा संपूर्ण प्रकार घडला. ज्यामुळे महिला देखील भांबावून गेली.

दरम्यान, संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत त्या विकृत व्यक्तीच्या दुचाकीचा नंबर पाहिला. तेथून बाहेर आल्यानंतर त्या महिलेने फोनवरून आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर महिलेने कुटुंबीयांसह शहर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

VIDEO: मुली-महिलांना पाहताच वासनांध तरूण करतो Kiss, सीरियल किसरची दहशत

दुसरीकडे असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातील बोगद्यामध्ये घडला होता. या प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याने महिलांनी आता चांगलीच धास्ती घेतील आहे.

या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी वेळेत पावले उचलून त्या अज्ञात विकृत व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी सध्या साताऱ्यातील महिला वर्गाकडून केली जात आहे. तरच महिलांच्या मनात घर करून बसलेली भीती निघून जाईल. शिवाय अशा प्रकारचे कृत्य पुन्हा कोणी करण्याचे धाडसही करणार नाही. पोलिसी खाक्या दाखवून त्या वासनांध आरोपीला अद्दल घडविण्याची गरज आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा देखीला आता कामाला लागल्या आहेत.

VIRAL: एक बुलेटवर हिजाब घातलेल्या 4 मुली, बाईकवरून दिलं फ्लाइंग KISS

शहरामध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून 40 ते 45 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, हे सीसीटीव्ही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे रेकार्ड झालेले आरोपींचे चेहरे आणि त्यांच्या गाडीचा नंबर स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास बरचे अडथळे येत असल्याचं दिसत आहेत. सातारा शहरात गेल्या सहा ते सात महिन्यांत 20 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता या सगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने सातारा पोलिसांना कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे.

मुली-महिलांना पाहताच वासनांध तरूण करतो Kiss

बिहारच्या जमुई येथील एक सीसीटीव्ही फुटेजमधून हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका हॉस्पिटलच्या आवारात एक महिला मोबाइलवर कोणाशी तरी बोलत होती. याचवेळी एक तरुण अचानक महिलेच्या मागून आला आणि महिलेला काही कळायच्या आत त्याने जबरदस्तीने महिलेचे चुंबन घेतलं. अचानक एखादा तरूण येऊन आपल्या ओठांचं चुंबन घेईल ही गोष्ट तिच्या ध्यानीमनी देखील नव्हती. त्यामुळे या संपूर्ण घटनेने काही क्षण महिलाही अवाक् झाली. महिलेला काही समजेपर्यंत आरोपी तरूणाने तेथून पळही काढला होता.

Crime : ऑडिशनसाठी बोलावून विनयभंग अन् बलात्काराचा आरोप; बड्या उद्योगपतीवर गुन्हा दाखल

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना