shraddha walker Murder :"मला वाचवा, नाहीतर तो मारून टाकेल", श्रद्धाच्या मदतीला मित्रही धावले, पण...

shraddha walker Murder case : आफताब अमीन पूनावालाने हत्या करण्यापूर्वी श्रद्धा वालकरने मित्रांकडे मागितली होती मदत...
shraddha walker Murder case updates
shraddha walker Murder case updates

वसईतली मराठी तरुणी श्रद्धा वालकरच्या हत्येनं दिल्ली हादरली. देशभरात या घटनेची चर्चा सुरू असून, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावालाने हत्या करण्यापूर्वी एकदा श्रद्धाने मित्रांकडे मदत मागितली होती, अशीही माहिती आता समोर आलीये.

हत्या करण्यापूर्वी काही दिवस आधी श्रद्धा वालकरने आपल्याशी संपर्क केला होता, अशी माहिती तिच्या मित्राने दिलीये. हत्या करण्यापूर्वी आफताब अमीन पूनावालाने श्रद्धाला खूप वेळा बेदम मारहाण केली होती, असंही या मित्राने सांगितलं. बॉयफ्रेंड आपली हत्या करू शकतो, अशी शंका आल्यानंतर तिने (shraddha walker Murder) मित्रांकडे मदत मागितली होती.

मयत श्रद्धा वालकरचा (shraddha walker Murder) मित्र लक्ष्मण नादरने इंडिया टुडेशी बोलताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. "त्या दोघांमध्ये (श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला) खूप मारहाण व्हायची. एकदा तिने (shraddha walker) व्हॉट्सअप वर मेसेज केला होता आणि म्हणाली होती की, मला वाचव. माझ्या घरातून घेऊन जा. मी त्याच्यासोबत (आफताब पूनावाला) आज राहिले, तर तो मला मारून टाकेल. त्या दिवशी आम्ही मित्र तिला तिच्या रुमवरून घेऊन आलो होतो. आम्ही आफताबला समजही दिली होती की, आम्ही पोलिसांकडे तक्रार करू. पण, श्रद्धाने सांगितल्यामुळे आम्ही तक्रार केली नाही", असं लक्ष्मण नादर म्हणाला.

shraddha walker Murder case updates
" ....तर आज श्रद्धा जिवंत असती " हत्या झालेल्या मुलीच्या आठवणीत वडील ढसाढसा रडले

shraddha walker Murder : श्रद्धा संपर्कात नसल्याची लक्ष्मणने तिच्या भावाला सांगितलं अन्...

श्रद्धा वालकर संपर्कात नसल्याची माहिती लक्ष्मण नादरने तिच्या कुटुंबियांना दिली. अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून श्रद्धा मित्रांच्या संपर्कात नाही, असं त्याने तिच्या भावाला सांगितलं. त्यानंतर भावाने ही माहिती विकास वालकर (श्रद्धाचे वडील) यांना दिली आणि नंतर तिच्या वडिलांनी दिल्लीत जाऊन पोलिसांत तक्रार दिली.

नादर म्हणाला, "ऑगस्ट महिन्यापासून मला चिंता वाटायला लागली. कारण दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ गेला होता आणि श्रद्धासोबत कुणाचंच बोलणं झालं नव्हतं. तिने माझ्या मेसेजचा रिप्लायही दिला नव्हता. तिचा फोन स्विच ऑफ होता. त्यामुळेच मला चिंता वाटत होी. मी तिच्याबद्दल इतर मित्रांकडेही चौकशी केली आणि त्यानंतर तिच्या भावाला माहिती दिली."

shraddha walker Murder case updates
पालघर : मुंबईत प्रेम... दिल्लीत गेल्यावर गर्लफ्रेंडचे केले तुकडे; तरुणीच्या हत्येचं कसं उलगडलं गूढ?

मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये श्रद्धा वालकरला शेजाऱ्यांनी आफताब अमीन पूनावालाच्या घरी जाताना अनेकदा पाहिलं होतं. आरोपी आफताब पूनावाला एक छोटा भाऊ आहे. श्रद्धासोबत दिल्लीत शिफ्ट होण्यापूर्वी आफताब पूनावाला वसई पश्चिममध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहत होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in