Shraddha Murder: DNA चाचणी, रक्त नमुन्यांची तपासणी आणि नार्को टेस्ट; ‘असं’ उलगडणार हत्येचं गूढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shraddha Walker Murder Mystery https: श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे अवघा देश हादरला आहे. अशात आता अटक करण्यात आलेला आफताब पूनावाला खरं बोलतो आहे की खोटं? याचा निर्णय नार्को टेस्टमुळेच होऊ शकणार आहे. न्यायालयातून आफताबच्या नार्को चाचणीची संमती मिळाली आहे. त्यामुळे आता आफताबने केलेल्या सैतानी कृत्याशी संबंधित सगळ्या गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे. या सगळ्या तपासात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक आहे जंगलातून मिळालेल्या हाडांचा डिएनए रिपोर्ट आणि दुसरी गोष्ट नार्को टेस्ट.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचे पुरावे

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातले पुरावे आणि धागेदोरे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहेत. दिल्ली पोलिसांनी जी नार्को चाचणीची मागणी केली होती ती न्यायालयाने मान्य केली आहे त्यामुळे दिल्ली पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांना आता ही अपेक्षा आहे की आफताबने केलेल्या सैतानी कृत्यांचा संपूर्ण कबुली जबाब त्यांना मिळू शकणार आहे. दिल्ली पोलिसांनी रोहिणी फॉरेन्सिक लॅबमध्ये नार्को चाचणीसाठी अर्ज केला आहे. तिथे आफताबच्या नार्को चाचणीची वेळ मागण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.

Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आफताब विरोधात कठोर कारवाईसाठी..

आफताब पूनावालाने जे निर्घृण कृत्य केलं आहे त्याविरोधात सबळ पुरावे गोळा करून त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे पोलिसांसाठी महत्त्वाचं आहे. पुरावे धुंडाळत असताना पोलीस दिल्लीसह पाच राज्यांमध्ये पोहचले आहेत. श्रद्धाच्या हत्येचा एक एक पुरावा शोधण्यासाठी पोलीस आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पोहचले आहेत. श्रद्धाचा मोबाइल आफताबने मुंबईत फेकल्याची बाब समोर आली होती. त्याचप्रमाणे या हत्येशी निगडीत काही महत्त्वाचे पुरावे हिमाचल प्रदेशात लपलेले असू शकतात असं पोलिसांना वाटतं आहे.

Shraddha Murder श्रद्धाप्रमाणेच Dexter वेबसीरिज पाहून जगभरात झाल्या आहेत ‘इतक्या’ हत्या

ADVERTISEMENT

आफताबला घेऊन पोलीस हिमाचल प्रदेशात जाणार

आफताबला घेऊन पोलीस हिमाचल प्रदेशात जाणार आहेत. त्या ठिकाणी आफताबला घेऊन क्राईम सीन रिक्रिएट केला जाण्याची शक्यता आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची काही पथकं वेगाने कामाला लागली आहेत. त्यातलं एक पथक महरौलीच्या जंगलातली प्रत्येक जागा आणि तिथे काही पुरावे मिळतात का त्याचा शोध घेतं आहे. पोलिसांच्या हाती आत्तापर्यंत सबळ म्हणावा असा पुरावा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढते आहे.

ADVERTISEMENT

आफताबकडून पोलिसांची दिशाभूल

आफताब पूनावालाकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तो नीट माहिती देत नाही. त्यामुळेच त्याच्या नार्को चाचणीची मागणी पोलिसांनी केली होती ज्या चाचणीला संमती मिळाली आहे. तसंच पोलीस आता महरौलीच्या जंगलात या हत्याकांडाशी संबंधित पुरावे धुंडाळत आहेत. पोलिसांना आत्तापर्यंत १३ हाडं मिळाली आहेत. दुसरीकडे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिलिंडर ठेवण्याच्या जागी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे आपण ठेवल्याचं आफताबने सांगितलं होतं. तिथे जर रक्ताचे काही नमुने मिळाले आहेत. फॉरेन्सिक एक्स्पर्ट ते नमुनेही तपासत आहेत. ते मिळाले तर तेदेखील एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत. श्रद्धाच्या घरातल्यांचं डिएनए सँपलही पोलिसांनी त्यांच्या संमतीने मिळवलं आहे. त्यामुळे रक्ताच्या नमुन्यांची चाचणी, डिएनए सँपल आणि नार्को टेस्ट या तीन गोष्टी या हत्या प्रकरणात महत्त्वाच्या ठरणार आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT