घोरपडचे प्रायव्हेट पार्ट विकायचा! ज्योतिषाने एक दिवस केला मोठा कांड..'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

मुंबई तक

Monitor Lizard Shocking Viral News : फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एक ज्योतिष घोरपडचे (मॉनिटर लिजर्ड) प्रायव्हेट पार्टची विक्री करत होता

ADVERTISEMENT

Monitor Lizard Shocking Viral News
Monitor Lizard Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घोरपडचे प्रायव्हेट पार्ट विकायचा ज्योतिष

point

ज्योतिषाचा असा झाला पर्दाफाश

point

पोलिसांनी काय कारवाई केली?

Monitor Lizard Shocking Viral News : फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एक ज्योतिष घोरपडचे (मॉनिटर लिजर्ड) प्रायव्हेट पार्टची विक्री करत होता. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. ही घटना फरीदाबादच्या सेक्टर-8 मध्ये घडली. येथे अध्यात्मिक उपचाराचा व्यवसाय चालवणारा स्वयंभू ज्योतिष वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची विक्री करतो. यामध्ये घोरपडचं प्रायव्हेट पार्ट, नरम मुंगा (कोरल न्यूडिब्रांच) या प्राण्यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या अवयवांचा वापर गुप्त आणि तांत्रिक गोष्टींसाठी केला जात होता. यज्ञ दत्त असं आरोपीचं नाव आहे. तो 38 वर्षांचा आहे. 

घोरपडचे प्रायव्हेट पार्ट विकायचा ज्योतिष

हरियाणा वनविभाग, हरियाणा पोलीस, वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा आणि भारतीय वन्यजीव ट्रस्टच्या संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली. इतकच नाही, तर आरोपी यज्ञ त्याचं ज्योतिष कार्यालय आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रतिबंधित वस्तुंची विक्री करायचा. हिंदूस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टीमने त्याच्याकडून घोरपड (मॉनिटर लिजर्ड) च्या प्रायव्हेट पार्टचे तीन तुकडे आणि सॉफ्ट कोरलचे पाच तुकडे जप्त केले आहेत. 

हे ही वाचा >> सांगली हादरलं, संपूर्ण कुटुंब घरात पडलेलं निपचित, सासू-सुनेचा मृत्यू तर पिता-पुत्राची अवस्था गंभीर.. नेमकं काय घडलं?

10 हजार रुपयांचा दंड भरावं लागणार?

मॉनिटर लिजर्ड वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची अंतर्गत सूचीबद्ध आहे. या प्रजातीचं संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. देशात मॉनिटर लिजर्ड्सचे बॉडी पार्ट्स ठेवणे किंवा त्यांचा व्यापार करणं कायदेशीर गुन्हा आहे.

दोषी आढळल्यास आरोपीला तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसच आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. प्राण्यांचे अवयव विक्री आणि खरेदी करणाऱ्या लोकांचा तपास सुरु आहे. गुरग्रामचे विभागीय वन अधिकारी आरके जंगडा यांनी म्हटलं, या घटनेमुळं अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, पाहा कसा भरायचा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख

हे वाचलं का?

    follow whatsapp