चुलत बहीण सतत 'तो' सल्ला द्यायची, भावाच्या डोक्यात तिडीक गेली, भयंकर प्रकरण!

मुंबई तक

Crime News : एका महिलेची आणि तिच्या 13 वर्षीय मुलाची चाकू वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहीण सतत देत असलेल्या सल्ल्यामुळे भावानेच नाराज होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

चुलत बहीण सतत 'तो' सल्ला द्यायची

point

भावाच्या डोक्यात तिडीक गेली, भयंकर प्रकरण!

Crime News : एका 28 वर्षीय तरुणाने आपल्याच चुलत बहिणीची आणि तिच्या 13 वर्षांच्या निष्पाप मुलाची चाकूने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. शारदा साहू (वय 38) आणि तिच्या मुलाचे मृतदेह 20 आणि 21 मे च्या मध्यरात्री गोविंदपुरी येथील घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आले होते. या दुहेरी हत्याकांडानंतर दक्षिण-पूर्वी जिल्हा पोलिसांची अनेक पथके तपासात गुंतली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि स्थानिक गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता, या घटनेमागे मृत महिलेचा चुलत भाऊ सौरभ साहू याचाच हात असल्याचे उघड झाले, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. 

हेही वाचा : जावयाने व्यक्त केली 'ती' इच्छा, संतापलेल्या सासूने थेट शेवटच केला

पोलीस चकमकीत आरोपीच्या पायात लागली गोळी

देशाची राजधानी दिल्लीमधील गोविंदपुरी परिसरातून ही धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी सौरभ साहू (रा. संगम विहार) हा तुघलकाबाद एक्सटेंशन येथील घाटी वाला पार्कजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 22 आणि 23 मे च्या मध्यरात्री पोलिसांनी या परिसराला वेढा घातला. पोलिसांनी आरोपीला आत्मसमर्पण करण्यास सांगितले, मात्र त्याने जवळ असलेली बेकायदेशीर देशी पिस्तूल काढून पोलिसांवर थेट गोळीबार सुरू केला. आरोपीने एकूण चार राउंड फायर केले, ज्यातील एक गोळी सब-इंस्पेक्टर यशपाल यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर लागली, ज्यामुळे ते वाचले. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तीन राउंड फायर केले, ज्यातील एक गोळी आरोपीच्या पायाला लागली आणि पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' भागांना पाऊस झोडपणार, 15 जिल्ह्यांना IMD अलर्ट

बहिणीच्या सल्ल्याचा राग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा खुलासा

पोलिसांनी आरोपी सौरभ साहूकडून गुन्ह्यात वापरलेली देशी पिस्तूल, जिवंत व रिकामी काडतुसे आणि हत्येच्या वेळी अंगावर असलेले रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने बहीण आणि भाच्याच्या हत्येची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, तो आपल्या चुलत बहिणीचा द्वेष करायचा आणि त्यांच्यात वैयक्तिक वैर होते. शारदा साहू या त्याला सतत व्यसनापासून दूर राहण्याचा आणि गुन्हेगारी कारवाया सोडण्याचा सल्ला द्यायच्या, ज्याचा त्याला तीव्र राग होता. याच रागातून आणि चिढीतून त्याने मायलेकाचा काटा काढला. तपासात असेही समोर आले आहे कि आरोपी सौरभ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच चोरी, स्नॅचिंग, लूटमार आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत चार गुन्हे दाखल आहेत.

या  गुन्ह्यामुळे नातेसंबंधांना काळीमा फासला गेला असून, एका चांगल्या सल्ल्याची किंमत मायलेकाला आपल्या प्राणाने मोजावी लागली आहे. चकमकीत सुदैवाने कोणताही पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही आणि पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असला, तरी पोलीस या प्रकरणाशी जोडलेले इतर पुरावे गोळा करत आहेत. एका व्यसनी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने केवळ हटकल्याच्या रागातून स्वतःच्या बहिणीचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. दिल्ली पोलीस आता या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून आरोपीला न्यायालयात कडक शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?