मुलाने आईला तरुणासोबत बेडरूममध्ये नको ते करताना पकडलं, पुढे भयंकर घडलं

मुंबई तक

crime news : मुलाने आईला एका तरुणासोबत बेडरूममध्ये आक्षेपार्ह स्थितीत पकडल्याची माहिती समोर आली, हे प्रकरण लपवण्यासाठी आईने आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा कट रचत नको तेच केलं, या घटनेनं आई- लेकराच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचे तरुणाशी जुळले सूत 

point

लेकराने आईला आणि फैजानला नको त्या अवस्थेत पकडलं 

Crime News : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाणे परिसरात महिलेनं तिच्या प्रियकरासोबत कट रचून वर्षाच्या मुलाची कथितरित्या हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला तिचा प्रियकर फैजान आणि साथीदार रशीदला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर फैजानच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या पायात गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे ही वाचा : Astrology : शुक्र आणि केतूच्या युतीने 'या' राशींच्या अडचणीत वाढ होणार

महिलेचे तरुणाशी जुळले सूत 

पोलिसांच्या माहितीनुसार, रामनगरमधील मच्छरहट्टा येथे राहणाऱ्या सोना शर्मा यांनी दोन वर्षांपूर्वी एका अपघातात आपल्या पतीला गमावले होते.  ती आपला मुलगा सूरज (वय 10) आणि 5 वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. पोलिसांनी या प्रकरणी सांगितलं की, याच काळात त्यांचे गोलाघाट येथे राहणाऱ्या आणि त्यांच्या घरी येणाऱ्या फैजानशी प्रेमसंबंध जुळले होते. 

लेकराने आईला आणि फैजानला नको त्या अवस्थेत पकडलं 

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस उपायुक्त टी. सरवनन म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी, सूरजने त्याच्या आईला आणि फैजानला त्यांच्या बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. मुलगा गुपित उघड करेल या भीतीने ती महिला आणि तिचा प्रियकर घाबरले. नंतर फैजानने मुलाला ठार मारण्याचा कट रचला. ते पुढे म्हणाले, सोमवारी सायंकाळी, फैजानने सूरजला बावन बिघा मैदानात झुडपांत बोलावण्यात आले. तिथे, त्याने त्याचा मित्र राशीदच्या मदतीने, कथितरित्या मुलाचा गळा चिरून तिचा खून केला आणि मृतदेह लपवण्यात आला. 

गुन्हा लपवण्याचा प्रयत्नातून महिलेनं पहाटेच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत त्यांनी दावा केला की, आपल्या मुलाचं अपहरण करण्यात आलं. मंगळवारी रात्री पोलिसांनी बावन बीघा येथील झुडूपांमधून सूरजचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. नंतर आईवर संशय बळावला गेला, ती वारंवार फैजानचे नाव घेत असल्याचे ऐकू आले. पोलिसांनी तात्काळपणे फैजान आणि रशीदला ताब्यात घेतले. 

हे वाचलं का?