Divya Pahuja: छिन्न-विच्छिन्न अवस्था… 11 दिवसानंतर कसा लागला मॉडेलच्या मृतदेहचा छडा?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Divya Pahuja: छिन्न-विच्छिन्न अवस्था... 11 दिवसानंतर कसा लागला मॉडेलच्या मृतदेहचा छडा?
Divya Pahuja: छिन्न-विच्छिन्न अवस्था... 11 दिवसानंतर कसा लागला मॉडेलच्या मृतदेहचा छडा?
social share
google news

Hariyana Murder Case : काही दिवसांपूर्वी मॉडेल दिव्या पाहुजाच्या (divya pahuja) हत्येच्या सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. तिच्या मृतदेहाचा हरियाणातील गुरूग्राम पोलीस शोध घेत होते. आज (13 जानेवारी) हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील कालव्यात दिव्याचा मृतदेह सापडला. (Haryana Crime News In bhakra canal dead body of model divya pahuja trapped diver-took out under bridge)

ADVERTISEMENT

दिव्याला एका हॉटेलमधील खोलीत गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं. मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या बलराज गिल याने पोलिसांना पटियाला कालव्यात मृतदेह फेकल्याचे सांगितले. साहजिकच, कालव्याचा प्रवाह खूप तीव्र आहे, त्यामुळे मृतदेह शोधणे कठीण झाले होते.

वाचा : 4 मुलांचा बाप.. 5 मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला, पत्नीही पाचव्यांदा गरोदर…

पोलिसांना कसा केला मॉडेलच्या मृतदेहाचा तपास?

अथक प्रयत्नानंतर हरियाणा पोलीस, एनडीआरएफ आणि गोताखोरांना दिव्याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह भाक्रा कालव्यात एका ठिकाणी कचऱ्यात अडकला होता. फतेहाबादच्या जाखल शहरातील कुडनी हेड येथील कालव्यातून पोलीस आणि गोताखोरांनी दिव्या पाहुजाचा मृतदेह बाहेर काढला. तिच्या हातावर असलेल्या टॅटूंमुळे तिची ओळख पटली आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

25 पथके 48 तास शोध मोहीम

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या पाहुजाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पटियाला ते जाखलपर्यंत 150 किलोमीटर भाक्रा कालव्याचा शोध घेतला. बलराज गिलच्या प्राथमिक चौकशीनंतर 25 हून अधिक पथकांनी गेल्या 48 तासांपासून शोधमोहीम राबवली. आरोपी अभिजीत सिंगच्या घरातून दोन शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. हत्येतील आरोपी अभिजीत सिंगला अवैध शस्त्रे जोपासण्याची आवड आहे. अभिजीतच्या ठिकाणांवरून दोन बेकायदेशीर पिस्तूल आणि 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

वाचा : 12th fail : IPS मनोज कुमार शर्माचं महाराष्ट्र कनेक्शन, ‘या’ शहरांत होते अधिकारी

दिव्याचा हत्येचं कारण काय?

गुरुवारी (११ जानेवारी) कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या आरोपी बलराज गिलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृतदेह जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी बलराज गिल याने हत्येनंतर दिव्याच्या मृतदेहाची कालव्यात विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी सांगितले की पाच जणांनी पाहुजाला हॉटेल सिटी पॉइंटवर नेले आणि खोली क्रमांक 111 मध्ये तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या कारण ती हॉटेल मालक अभिजीत सिंग (56) याला “अश्लील फोटो” दाखवून ब्लॅकमेल करत पैसे उकळत होती.

ADVERTISEMENT

गुरुग्रामचे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) वरुण कुमार दहिया यांनी सांगितले की, दिव्या पाहुजाचा मृतदेह तोहानातील भाक्रा कालव्याच्या उपनदी कालव्यात सापडला. हॉटेल सिटी पॉइंटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिजीत सिंह आणि इतर आरोपी एका पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह लॉबीमध्ये ओढताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

वाचा : ‘लोकसभेनंतर राज्यात राजकीय भूकंप’, पंतप्रधानांसमोरच CM शिंदेंचं मोठं विधान

भाक्रा कालव्यात आढळला मृतदेह

पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर अभिजीत सिंगने हॉटेलपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बलराज गिल (28) याला कार सुपूर्द केली होती. पंजाबमधील पटियाला येथील बसस्थानकावर ही कार सापडली. ज्यामध्ये कुणीही नव्हतं.

गिलला गुरुवारी (11 जानेवारी) कोलकाता विमानतळावरून पकडण्यात आले आणि त्याने केलेल्या खुलाशांच्या आधारे पोलिसांनी पाहुजाच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली. गिल आणि अन्य आरोपी रवी बंगा यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT