दोन बहिणी मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत मोबाइलवर... पुढच्या क्षणीच दोघींचा मृत्यू
Honor Killing : वडिलांनी दोन लेकांना हाताशी धरून दोन तरुणींची हत्या केली. दोन्ही बहिणी गावातील तरुणांसोबत प्रेमसंबंधात होत्या. हाच राग मनात ठेवून हा धक्कादायक प्रकार घडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन बहिणींना बेदम मारहाण आणि दुर्दैवी मृत्यू
वडील आणि भाऊ घटनास्थळावरून फरार
Honor Killing : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेवारही पोलीस ठाणे परिसरात वडिलांनी दोन लेकांना हाताशी धरून दोन तरुणींची हत्या केली. दोन्ही बहिणी गावातील तरुणांसोबत प्रेमसंबंधात होत्या. हाच राग मनात ठेवून हा धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्री दोन्ही बहिणींना त्यांच्या प्रियकरांशी मोबाईवर बोलताना वडिलांनी पाहिलं होतं, तेव्हा भाऊ संतापले आणि रागात त्यांनी घरातच लाठीकाठीने बेदम मारहाण करून दोघींना ठार केले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत दोन्ही आरोपी भावांना अटक केली. दरम्यान मुख्य आरोपी वडील अद्याप फरार आहे.
हे ही वाचा : पालघर : सर्पदंशामुळे 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
तरुणीच्या वडिलांचे नाव रामप्रसाह साहनी असे असून त्यांनीच आपल्या मुलींविरूद्ध यापूर्वी पोलीस ठाण्यात तीन तक्ररी दाखल केल्या होत्या. घडलेल्या घटनेनुसार, दोन्ही बहिणी यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेल्या होत्या, नंतर सेवारही पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना दुसऱ्याच शहरातून परत आणून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
दोन बहिणींना बेदम मारहाण आणि दुर्दैवी मृत्यू
पोलिसांच्या कारवाईनंतर, वडील रामप्रसाद आणि त्यांच्या भावांनी दोन बहिणींना तरुणांपासून दूर राहण्याची आणि भविष्यात कोणताही संपर्क न ठेवण्याची वारंवार ताकीद दिली होती. त्यांच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध असून त्या दोन बहिणींना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : बीड: 'कार्यक्रम ओक्के', बायकोनं प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची केली हत्या, पुढे..
वडील आणि भाऊ घटनास्थळावरून फरार
या दुहेरी हत्याकांडात आरोपी वडील आणि भाऊ घटनास्थळावरून फरार झाले. सकाळी घटनेची माहिती पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सेवारही पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी दोन्ही बहिणींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणात दोन भावांना अटक केली.









