Pune : धक्कादायक! बायकोशी वाद झाला, किरकोळ भांडणावरून नवऱ्याने….

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

husband wife argument minor reason husband suicide pune crime story
husband wife argument minor reason husband suicide pune crime story
social share
google news

नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून वाद होतच असतात. मात्र याच किरकोळ कारणावरून एका नवऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. बायकोसोबत किरकोळ कारणातून वाद झाला आणि या वादातून बायको माहेरी निघून गेल्याने नवऱ्याने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निलेश महादेव काकडे (वय 40) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. निलेश यांच्या मृत्यूने आता परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. (husband wife argument minor reason husband suicide pune crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिंपरी चिंचवडच्या जाधववाडीत निलेश काकडे त्यांच्या बायको मुलांसोबत राहत होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच निलेश काकडे यांचा त्याच्या बायकोशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून निलेश काकडे यांची बायको मुलांसोबत माहेरी निघून गेली होती. या घटनेमुळे निलेश काकडे तणावात देखील होते. या प्रकरणी निलेश काकडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखलीमध्ये पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा : Cyber Crime: तुम्हीही सतत पॉर्न पाहता?, एक Email अन् तुमचा खेळ खल्लास!

या तक्रारीनंतर घरी पत्नी आणि मुले नसल्याने निलेश काकडे मसवड येथील आपल्या मेहुण्याकडे राहण्यासाठी निघाले होते. बायको सोडून गेल्याने निलेश काकडे नैराश्यातही गेले होते. त्यामुळे तणावातून पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावत त्यांनी नीरा नदीपाञात उडी मारुन आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

हे वाचलं का?

या दरम्यान निलेश काकडे यांची दुचाकी सारोळा पुलावर पुणेहून साताऱ्याला जाणाऱ्या दिशेने लावल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी नीरा नदीपाञात उडी मारुन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. या संशयातून तब्बल दोन दिवस महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टिम, महाबळेश्वर व शिरवळ रेस्क्यू टिमच्या मदतीने या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर शुक्रवारी या शोधमोहिमेला यश आले आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Sana Khan: नागपूरमधील ‘त्या’ भाजप महिला नेत्याची हत्या, आरोपी निघाला…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT