अल्पवयीन मुलीसोबत व्हिडीओ कॉलवर लग्न! नंतर, व्हर्चुअल हनीमून अन्... सोशल मीडियावरील मैत्रीमुळे नको ते घडलं...
सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचा अश्लील व्हिडीओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अल्पवयीन मुलीसोबत व्हिडीओ कॉलवर लग्न!
नंतर, पीडितेसोबत व्हर्चुअल हनीमून अन्...
सोशल मीडियावरील मैत्रीमुळे नको ते घडलं...
Crime News: सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचा अश्लील व्हिडीओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित घटना ही छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. बिहारच्या पाटणा येथील रहिवासी असलेल्या कुंदन राज नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर पीडितेचं प्रोफाइल पिक्चर पाहून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, आरोपी तरुणाने पीडित तरुणीला स्वत: विषयी खोटी माहिती सांगत, तिच्यासोबत मैत्रीसाठी विचारलं.
व्हर्च्युअल लग्न केलं अन् व्हिडीओ कॉलवर हनीमून...
मात्र, पीडितेने तरुणाला मैत्री करण्यासाठी नकार दिला. एके दिवशी, कुंदनने आपल्या हाताची नस कापलेला फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून तरुणीची सहानुभूती मिळवली. त्यानंतर, त्याने तरुणीला सतत व्हिडीओ कॉल करण्यास सुरूवात केली. प्रेम आणि लग्नाच्या आमिष दाखवून त्याने मोबाईल फोनवर पीडितेसोबत व्हर्च्युअल लग्न केलं आणि हनीमून साजरा करण्याच्या बहाण्याने तरुणीची मोठी फसवणूक करण्यात आली. आरोपीने व्हिडिओ कॉल दरम्यान पीडितेचे अश्लील व्हिडीओ बनवले.
हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर: विवाहित मुलगी प्रियकरासोबत गेली पळून! सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...
मित्रासोबत हनीमून साजरा करण्याची मागणी
आरोपीने पीडितेच्या शूट केलेल्या अश्लील व्हिडीओंच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मुलगी भितीपोटी कुंदनचं सगळं काही ऐकत राहिली. मग कुंदनने पीडितेकडे एक विचित्र मागणी केली, तो म्हणाला, "मी बाहेर आहे आणि म्हणून मी माझ्या मित्राला पाठवत आहे. त्याच्यासोबत तू हनीमून साजरा कर, मी ते व्हिडीओ कॉलवर बघेन." खरं तर, आरोपीकडे तरुणीच्या कुटुंबियांचे आणि मैत्रिणींचे सुद्धा होते. त्यामुळे, आरोपीच्या सततच्या धमक्यांना पीडिता घाबरू लागली.
हे ही वाचा: सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाले... कल्याणच्या रौनक सिटीत 19 व्या मजल्यावरून उडी घेऊन 8 वीत शिकणाऱ्या पीडितेची आत्महत्या!
अखेर, पीडितेने धाडस दाखवून तिच्या बहिणीसह कुंदनविरुद्ध पोलीस ठाण्यात गेली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलीस ठाण्यात याबाबत तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आला. चौकशीदरम्यान, कुंदनने त्याचा साथीदार दिलीप चौहानचं नाव सांगितलं. संबंधित घटनेपासून दिलीप फरार होता आणि राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांपासून पळ काढत होता. पोलिसांनी दिलीपचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर, अखेर त्याला अटक करण्यात येईल. पीडितेने कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीची ओळख पटवली. चौकशीदरम्यान दिलीपने गुन्ह्याची कबुली दिली. पुरेशा पुराव्यांसह त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येत आहे.










