27 दिवसांच्या नवजात बाळाची हत्या अन् पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला... महिलेने का केलं 'असं' निर्घृण कृत्य?

मुंबई तक

आरोपी महिलेने आपल्याच 27 दिवसांच्या नवजात बाळाची गळा दाबून हत्या केली आणि त्यावेळी, बाळाला वाचवण्यासाठी आलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

महिलेने का केलं 'असं' निर्घृण कृत्य?
महिलेने का केलं 'असं' निर्घृण कृत्य?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

27 वर्षांच्या नवजात बाळाची हत्या

point

पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला...

point

महिलेने का केलं 'असं' निर्घृण कृत्य?

Crime News: विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी महिलेने आपल्याच 27 दिवसांच्या नवजात बाळाची गळा दाबून हत्या केली आणि त्यावेळी, बाळाला वाचवण्यासाठी आलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

ही घटना मध्य प्रदेशातील भिंड येथील मालनपुर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. भयानक घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला आरोपी महिलेला अटक करण्यात आली. अटकेनंतर, महिलेने आपली चूक झाल्याचं सांगून गुन्हा कबूल केला. 

मालनपूरच्या वॉर्ड 14 मध्ये राहणार पीडित पती जगन्नाथ म्हणाला की, एक वर्षापूर्वी शिवपुरी जिल्ह्यातील खानियाधाना येथे राहणाऱ्या उषा बघेल नावाच्या महिलेशी त्याची झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. एक महिन्यापूर्वी, जगन्नाथ आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन त्याच्या गावी गेला होता. 3 ऑक्टोबर रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. तीन दिवसांपूर्वीच तो आपल्या पत्नी आणि मुलासह मालनपुर येथे आला होता. 

हे ही वाचा: तिघी मैत्रिणी गावातून एकत्र झाल्या गायब! 'त्या' बहाण्याने घराबाहेर पडल्या अन्... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा...

झोपलेल्या बाळाचा गळा दाबून खून...

पीडित पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीला तो दुसऱ्या महिलेशी बोलत असल्याचा संशय होता. याच कारणामुळे, त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री सर्वांचं जेवण झाल्यानंतर पती झोपला आणि तेव्हा रात्री 1:15 वाजताच्या सुमारास पत्नीने आपल्या झोपलेल्या बाळाचा गळा दाबून निर्घृण खून केला. त्यावेळी, बाळाला वाचवण्यासाठी आलेल्या पतीवर सुद्धा महिलेने चाकूने वार केला आणि तो चाकू त्याच्या गुप्तांगाला लागल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे, पीडित पती गंभीररित्या जखमी झाला. घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील लोकांना सुद्धा जाग आली त्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल कळवलं. त्यानंतर, जखमी पती आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp