Crime: हे काही तरी भलतंच... रक्त जास्त निघालं म्हणून Killer ला सुपारीचे पैसेच नाही दिले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Navi Mumbai Crime latest Update
Navi Mumbai Crime latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईत हत्याकांड झाल्यानं खळबळ उडालीय

point

दोन रिअल इस्टेट एजंटची केली हत्या

point

पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात पाच जणांना केली अटक

निलेश पाटील, नवी मुंबई

ADVERTISEMENT

Navi Mumbai latest Crime Update: नवी मुंबईत दोन रियल इस्टेट एजंटच्या हत्याकांडाचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारातून हा हत्याकांड झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विठ्ठल बबन नाकाडे (43), जयसिंग उर्फ राजा मधू मुदलीयार (३८), आनंद उर्फ एंड्री राजन कुज (39), विरेंद्र उर्फ गोऱ्या भरत कदम (24) आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सितापुरे उर्फ सिताफे (35) या आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी पुढील तपास करत आहेत. 

पोलिसांना कारमध्ये सापडले रक्ताचे डाग अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळचे रिअल इस्टेट एजंट अमिर खानजादा आणि सुमित जैन प्रॉपर्टी डीलच्या मिटिंगसाठी २१ ऑगस्टला कारने निघाले होते. परंतु, ते पुन्हा परतले नाही. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारमध्ये लागलेल्या जीपीएस सिस्टिमच्या मदतीने कारला शोधलं. ती कार खोपोलीत सापडली. या कारमधून पोलिसांना रक्ताचे डाग आणि दोन काडतूस सापडले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "नारायण राणे कुणाला धमक्या..."; राजकोटच्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

या गुन्ह्याची उकल लावण्यासाठी दोन्ही विभागातील आठ जणांची टीम तयार करण्यात आली होती. त्यानंतर पेण पोलिसांच्या हद्दीत सुमित जैनचा मृतदेह सापडला. गोळी घालून जैनचा खून केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी सोमवारी पाच आरोपींना अटक केली. तसच बुधवारी कर्नाळा अभयारण्यातून अमिर खानजादाचा मृतदेह जमा केला., मृत सुमित जैन, अमिर खानजादा उर्फ आरोपी विठ्ठल नाकाडेसोबत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे, अशी माहिती नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे. 

नवी मुंबईत झालेल्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विठ्ठल बबन नाकाडे , जयसिंग उर्फ राजा मधू मुदलीयार , आनंद उर्फ एंड्री राजन कुज , विरेंद्र उर्फ गोऱ्या भरत कदम आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सितापुरे उर्फ सिताफे, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारातून हा हत्याकांड झाल्याचं समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

हे ही  वाचा >> Optical Illusion : काय सांगता! 9 नंबर शोधण्यात भल्या भल्यांना आलंय अपयश, तुम्ही शोधू शकता?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT