Viral: ...अन् नको ते घडलं, जाहिरात फलकावर सुरू झाला अश्लील सिनेमा
Viral Story: दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये जाहिरातीच्या पडद्यावर अचानक अश्लील चित्रपट सुरू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आयटी कलमान्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जाहिरात फलकावर अचानक सुरू झाला अश्लील चित्रपट
आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या एच ब्लॉकमधील घटना
नवी दिल्ली: एका जाहिरात फलकावर अचानक एक अश्लील चित्रपट सुरू झाला. यावेळी तिथूनच जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला आणि त्याने आपल्या मोबाइलमध्ये घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर त्याने या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
वास्तविक, कॅनॉट प्लेसच्या एच ब्लॉकमध्ये एक डिजिटल अॅड बोर्ड लावण्यात आला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास या फलकावर अचानक एक अश्लील फिल्म सुरू झाली. यावेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला आणि पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस जाहिरात फलक कोणी हॅक केले होते का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा>> मैत्रिणीला मुलगा बनून पाठवली 'फ्रेण्ड रिक्वेस्ट, प्रेमात पडली तरुणी अन् नंतर घेतला गळफास
दिल्लीतही अशीच घटना पूर्वीही घडलेली
यापूर्वी दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर अशीच एक घटना घडली होती. स्टेशनवर जाहिरातीच्या पडद्यावर एक अश्लील चित्रपट सुरू झाला होता. त्यावेळीही काही लोकांनी ही घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली होती. या प्रकरणाचा तपास केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मुले दिसून आली होती.
हे वाचलं का?
या मुलांनी वायफायचा वापर करून एलईडी स्क्रीन आपल्या मोबाइलला जोडून अश्लील चित्रपट चालवल्याचा संशय होता. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा राजीव चौक मेट्रो स्थानक हे खचाखच भरले होते. लोक मेट्रोची वाट पाहत होते. त्याचवेळी अचानक जाहिरात स्क्रिनवर अश्लील फिल्म सुरू झाली होती.
हे ही वाचा>> Crime : पत्नीला आधीपासूनच होता मुलगा, सत्य समजताच नवऱ्याने दाखवलं खरं रूप!
या घटनेनंतर डीएमआरसीच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, 'ही जागा एका खासगी कंत्राटदाराला जाहिरातीसाठी देण्यात आली होती. स्थानक परिसरात अशी अश्लील क्लिप सुरु झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.'
ADVERTISEMENT
असं असताना आता पुन्हा एकदा सार्वजनिक स्थळी तशाच प्रकारची घटना घडल्याने दिल्ली प्रशासन आणि पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT