Seema Haider : बंद खोलीत सीमाचा डान्स; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

seema haider dance in sachin meena house video viral in social media in greater noida
seema haider dance in sachin meena house video viral in social media in greater noida
social share
google news

Seema Haider Video: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची (seema Haider) सध्या सोशल मीडियापासून, न्युज चॅनेल, चावडीवर खुप चर्चा आहे. PUBJतून प्रेम जुळल्यानंतर सीमाने आपल्या चार मुलांसह भारतात येऊन सचिन मीणा (Sachin meena) या तरूणाशी लग्न केले होते. या लव्हस्टोरीची सध्या सर्वत्र चर्चा असतानाच सीमाचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वंच अवाक झाली आहे. (seema haider dance in sachin meena house video viral in social media in greater noida)

ADVERTISEMENT

सीमाने भारतात येऊन सचिन मीणा या तरूणासोबत आपला नवीन संसार सुरु केला आहे. सचिनच्या या लग्नाचा त्याच्या कुटुंबियांचे समर्थन आहे. त्यामुळेच दोघे सध्या हातात हात घालून गावभर फिरत आहे. या संदर्भातलेच अनेक व्हिडिओ देखील बनवून त्यांनी इंस्टाग्राम शेअर केले होते. त्यामुळे या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. असे असतानाच आता एक आणखीण एक व्हिडिओ समोर आली आहे. या व्हिडिओत सीमा हैदर भारतीय संस्कृतीप्रमाणे नाचनाता दिसली आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : Seema Haider : ’72 तासांत सीमाला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर…’, कुणी दिली धमकी?

व्हायरल व्हिडिओत काय?

सीमाने हैदरने व्हायरल व्हिडिओत लाल कलरची साडी परिधाण केली आहे. डोक्यावर पदर आणि हातात बांगड्या देखील घातल्या आहेत.या पोषाखात सीमाने डान्स केला आहे. हा डान्स भारतीय संस्कृतीप्रमाणेच असल्याचे दिसून आले आहे. ज्याप्रमाणे भारतात लटके, झटके, ठुमके घेतले जातात त्याप्रमाणेच या व्हिडिओत सीमाने डान्स केला आहे. खरं तर प्रत्येक देशाची संस्कृती, रीतीरीवाज आणि डान्स करण्याची पद्धत वेगळी असेत. मात्र सीमा भारतीय संस्कृतीप्रमाणेच नाचत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Sathi Meenu (@seemasachin1020)

दरम्यान हा व्हिडिओ सचिन मीना याच्या घरातला असल्याची माहिती मिळत आहे. सचिनचे लग्न झाल्यापासून घरात काही रितीरीवाज सुरु आहे. अशाच एका कार्यक्रमात तिने डान्स केला आहे. विशेष म्हणजे सीमा हा डान्स करत असताना इतर महिला देखील तिला साथ देत आहे. त्यामुळे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  मुंबई ते चंद्रपूर… सेल्फीने ढकललं मृत्यूच्या जबड्यात! कुणी आई गमावली, तर कुणी तरूण मुलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT