तिघी मैत्रिणी गावातून एकत्र झाल्या गायब! 'त्या' बहाण्याने घराबाहेर पडल्या अन्... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा...
तीन दिवसांपूर्वी गावातील तीन तरुणी एकाच दिवशी बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तरुणींबद्दल माहिती मिळाली असून त्यातील एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तिघी मैत्रिणी गावातून एकत्र झाल्या गायब!
'त्या' बहाण्याने घराबाहेर पडल्या अन्...
पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा...
Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथे, तीन दिवसांपूर्वी गावातील तीन तरुणी एकाच दिवशी बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तरुणींबद्दल माहिती मिळाली असून त्यातील एका तरुणीला पोलिसांनी अमरोहाच्या जनपद येथून ताब्यात घेतलं आहे. तसेच, उर्वरित दोघींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास 17 वर्षांच्या तीन तरुणी कपडे खरेदी करण्याचं कारण सांगून एकत्र घराबाहेर पडल्या. मात्र, संध्याकाळपर्यंत त्या घरी परतल्याने कुटुंबियांना त्यांची चिंता वाटू लागली. कुटुंबियांनी त्या तिघींना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीच पुरावा हाती लागला नाही. त्यानंतर, 30 ऑक्टोबर रोजी तिन्ही तरुणींची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आधी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि नंतर, तिघींचं अपहरण झाल्याचा संशय बाळगून गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची घेतली मदत
संबंधित तरुणींजवळ मोबाईल फोन नसल्याकारणाने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. त्यावेळी, तीन मैत्रीणी एका ऑटोमध्ये बसून सॅटेलाइट बस स्टेशनजवळ पोहोचल्या आणि तिथून दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये चढल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. त्यानंतर, पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी अमरोहाच्या गजरौली येथे पोहोचले. तिथे तिन्ही तरुणींपैकी बेपत्ता असलेली एक तरुणी सापडली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता उर्वरित एक तरुणी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे आणि दुसरी रुद्रपुर येथे गेल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच पोलिसांची दोन पथके संबंधित ठिकाणी तपासासाठी रवाना झाल्या.
हे ही वाचा: ठाणे: आईने पोटच्या मुलीला बळजबरीने वृद्ध NRI कडे पाठवलं! मुलीच्या बदल्यात दरमहा 2.5 लाख रुपये...
प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आखली योजना
हिमाचल प्रदेश येथे गेलेली तरुणी यापूर्वी सुद्धा तिथेच राहत होती आणि तिच या संपूर्ण योजनेमागील सूत्रधार असल्याचं समोर आलं. ती आधी सोलनमधील एका औषध कंपनीत पॅकर म्हणून काम करत होती. तिथे तिची अमरोहाच्या एका तरुणासोबत ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तिच्या कुटुंबियांना तिच्या प्रेमसंबंधाबद्दल कळल्यानंतर त्यांनी तिला परत बरेली येथे बोलावलं आणि तिचा मोबाईल सुद्धा तिच्याकडून काढून घेतला. संबंधित तरुणीने ती कोणत्याही परिस्थितीत हिमाचलला जाऊन तिच्या प्रियकराशी लग्न करणार असल्याचं तिच्या आईला सांगितलं होतं. एके दिवशी, तिने तिच्या दोन्ही मैत्रिणींना तिच्यासोबत पळून जाण्यासाठी तयार केलं. तिने त्या दोघांनाही सांगितलं की त्या दिल्ली किंवा हिमाचलला जाऊन नोकरी करू शकतात आणि आपल्या इच्छेनुसार जीवन जगू शकतात.










