Crime : बायकोच्या नरडीचा घोट घेतला, नंतर मृतदेहासोबत…
अनिलचा बायको प्रियंकाशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच अनिलने प्रियंकाची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर अनिलला त्याने केलेल्या घटनेचा पश्चाताप झाला.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh Crime News : क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. पती-पत्नीच्या नात्यात अशा घटना सर्वाधिक घडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका नवऱ्याने क्षुल्लक कारणावरून बायकोचा गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर नवऱ्याला पश्चाताप झाला होता. आणि त्यामुळेच तो रात्रभर बायकोच्या मृतदेहासोबतच झोपला. या हत्याकांडानंतर शहर हादरले आहे.(uttar pradesh crime story gorakhpur man murder his wife shocking crime story)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूरमध्ये (Gorakhpur) ही घटना घडली आहे. या घटनेतील 70 वर्षीय मुन्नीलाल बेलदार यांना तीन मुले आहेत. त्यापैकी 30 वर्षांचा अनिल हा सर्वात लहान मुलगा आहे. त्याचा विवाह खलीलाबादच्या प्रियंकासोबत केवळ 3 वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनाही अद्याप मूलबाळ नाही. आरोपी अनिल बाहेर राहून पैसे कमावतो, तर त्याची बायकोही गावीच राहते. दरम्यान काहीच दिवसापूर्वीच अनिल गावी परतला होता.
हे ही वाचा : Mla Disqualification : खरी शिवसेना कुणाची, कसं ठरणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर
गावी परतल्याच्या काही दिवसातच अनिलचा बायको प्रियंकाशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच अनिलने प्रियंकाची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर अनिलला त्याने केलेल्या घटनेचा पश्चाताप झाला. आणि रात्रभर अश्रू ढाळत आणि बायकोच्या चेहऱ्यावर हात फिरवत तो तिच्याच मृतदेहाच्या शेजारीच झोपी गेला होता.
हे वाचलं का?
सकाळ झाल्यावर मुलगा आणि सून घराबाहेर न पडल्याने अनिलच्या वडिलांनी काळजी वाटू लागली, त्यामुळे त्यांनी खोलीचे दार ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिलने दारच उघडले नाही. त्यानंतर वडिलांनी खोलीच्या खिडकीतून पाहिले असता, सून मृतावस्थेत पडली होती. त्यानंतर वडिलांनी पोलिसांना य़ा घटनेची माहिती दिली होती.यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत दरवाजा तोडला असता,त्या्च्या हाती प्रियांकाचा मृतदेह लागला. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी पती अनिलला देखील अटक केली.
हे ही वाचा : Jitendra Awhad : “महाराष्ट्रात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, RSSचा निर्णय”
या संदर्भात पतीची चौकशी केली असता त्याने सांगितले, रात्री आमच्यात भांडण झाले होते. त्यामुळे मी रागाच्या भरात तिचा गळा दाबला होता, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. मला तिला जाणूनबुजून मारायचे नव्हते, तिच्या मृत्यूनंतर मला खूप पश्चात्ताप झाला आहे, असेही अनिल म्हणाला.या प्रकरणी आता आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT