तिसऱ्या नवऱ्याचे केले 10 तुकडे, फ्रिजमध्ये ठेवून एक-एक फेकले, श्रद्धा वालकरप्रमाणेच केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रद्धा खून प्रकरणाच्या चर्चेनंतर दिल्लीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पांडवनगर येथील पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मुलाला अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आधी गळा चिरून हत्या केली. यानंतर मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. दोघेही रोज गुपचूप मृतदेहाचे तुकडे जवळच्या मैदानात टाकायचे. आता याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने खुलासा केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डीसीपी क्राइम अमित गोयल यांनी सांगितले की, 5 जून रोजी पोलिसांना रामलीला मैदानावर शरीराचे काही अवयव सापडले. तीन ते चार दिवसांनंतर मैदानात शरिराचे तुकडे सापडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल आला होता. पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही ओळख पटू शकली नाही. या प्रकरणात कोणतीही मदत मिळाली नाही.

याप्रकरणी दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत होते. नुकतेच, सीसीटीव्ही फुटेज आणि मैदानाच्या आजूबाजूच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी नुकतेच मृत व्यक्तीची अंजन अशी ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी अंजनचा शोध घेतला असता तो ५ ते ६ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांत दाखल झालेली नव्हती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंजन त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता

यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता अंजन त्याची दुसरी पत्नी पूनमसोबत दिल्लीत राहत असल्याचे समोर आले. दिल्ली पोलिसांनी पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांची चौकशी केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. घटनेच्या वेळी पूनम आणि तिच्या मुलाने घातलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

बिहारची रहिवासी असलेल्या पूनमचे ​​वयाच्या १३व्या वर्षी सुखदेवसोबत लग्न झाले होते. दोघांनाही एक मूल होते. पण सुखदेव नंतर पूनमला सोडून दिल्लीला आला. त्याच्या शोधात पूनमही दिल्लीला आली.पूनमला सुखदेव इथे सापडला नाही, पण तिची कल्लूशी जवळीक वाढली. दोघांचे लग्न झाले. दोघांना आरोपी दीपकसह तीन मुले होती.

ADVERTISEMENT

2016 मध्ये कल्लूचा आजारपणात मृत्यू झाला. यानंतर पूनम अंजनसोबत राहू लागली आणि 2017 मध्ये दोघांनी लग्न केले. पूनमचे ​​हे तिसरे लग्न होते. दुसरीकडे, अंजनचे बिहारमध्ये आधीच लग्न झाले होते. त्याला 8 मुलेही होती. पण ही गोष्ट त्याने त्याची दुसरी पत्नी पूनमपासून लपवून ठेवली होती.

ADVERTISEMENT

दोघांमध्ये भांडण व्हायचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजन कोणतेही काम करत नसे. तो पूर्णपणे पूनमवर अवलंबून होता. त्याने पूनमचे ​​दागिनेही विकून पैसे बिहारला पाठवले होते. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. मात्र हे प्रकरण खुनापर्यंत पोहोचले जेव्हा दीपकने लग्न झाले. अंजन दीपकची पत्नी आणि बहिणीवर चुकीची नजर ठेवत असल्याचा पूनमला संशय होता. अशा स्थितीत दोघांनी अंजनच्या हत्येचा कट रचला.

नशेचं औषध देऊन गळा चिरला

पूनम आणि दीपकने आधी अंजनला घरी बोलावले. यानंतर त्याला गुंगीचे औषध देण्यात आले. यानंतर त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. एवढेच नाही तर मृतदेहाचे रक्त सुकेपर्यंत दोघेही थांबले. दुसऱ्या दिवशी दोघांनी रक्त स्वच्छ केले. दोन्ही पांडव नगर रामलीला मैदानात मृतदेहाचे तुकडे फेकत राहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे 8-10 तुकडे करण्यात आले होते. वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी हे तुकडे जप्त केले आहेत. त्याची पडताळणी केली जात आहे. अंजन दास याच्या कुटुंबीयांशी डीएनए मॅच करून मृतदेहाचे हे तुकडे ओळखले जातील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT