Beed: धक्कादायक! विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी पतीची हत्या, पत्नीनेच दिली सुपारी

11 जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता.
Beed: धक्कादायक! विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी पतीची हत्या, पत्नीनेच दिली सुपारी
Beed Crime News(प्रातिनिधिक फोटो)

रोहिदास हातागळे (बीड)

बीड: बीडमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, चक्क एका महिलेने सुपारी देऊन पतीचा काटा काढला आहे. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी अपघात झाल्याचं भासविलं, मात्र बीड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन या सिनेस्टाइल हत्येचा उलगडा केला. मंचक गोविंद पवार 45 रा.वाला ,ता. रेणापूर जि.लातूर, हमु अंकुशनगर , बीड असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

11 जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता. यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचं भासविण्यात आलं होतं, तर यादरम्यान पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच जखम नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला 1 कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, 10 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी 2 लाख रुपये इसार म्हणून मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोपी पत्नी गंगाबाई मंचक पवार 37, रा . वाला , ता . रेणापूर जि . लातूर, हमु . अंकुशनगर , बीड, श्रीकृष्ण सखाराम बागला 27, रा. काकडहिरा ता.बीड, सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे 47, रा . पारगाव सिरस ता.बीड व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील पत्नीसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार दोघांचा तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in