Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / ‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’

भिलवाडा: राजस्थानच्या भिलवाडामध्ये मुलींची खरेदी-विक्रीचा प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. एका मुलीने ती 10 वर्षांची असताना तिची खरेदी-विक्री झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. एवढंच नव्हे तर राजस्थानसह देशातील अनेक राज्यात तिला वेश्याव्यवसायासाठी पाठवण्यात आलं असल्याचंही पीडित मुलीने म्हटलं. शरीर विकून दलालांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत, पण आता आपण थकून गेल्याचं सोशल मीडिया लाइव्हच्या माध्यमातून तिने म्हटलं आहे. भिलवाडा येथे राहणाऱ्या तरुणीने एक व्हिडिओ जारी करून या गोष्टी सांगितल्या आहेत. मुलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एसपींनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. (they earned crores by selling my body now i am tired girl trapped in quagmire of prostitution sought help)

वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या मुलीने व्हिडिओ जारी केला आणि म्हणाली- ‘नमस्कार, मी माझ्या स्वेच्छेने व्हिडिओ बनवत आहे, कोणतीही जबरदस्ती नाही, दबाव नाही. मी 10 वर्षांची असताना मला माधोपूरमध्ये विकण्यात आले. 11 व्या वर्षी मला या व्यवसायात ढकलण्यात आले. एक-दोन वर्षे तिथे ठेवल्यानंतर माझी विक्री झाली. टोंकच्या देवळी तहसील पोलाडा येथे मला 8-9 वर्ष धंदा करायला भाग पाडलं.’

‘यानंतर मला भुसावळ, मुंबई, जयपूर ज्या-ज्या ठिकाणी पाठविण्यात आलं तिथे-तिथे मी गेली आणि यांना कोट्यवधी रुपये कमावून दिले’, असे मुलीने सांगितले. ‘किशनने मला विकत घेतले होते. शंभू आणि प्रेमने माझ्यावर खूप अत्याचार केला. ते अनेक मुलींना विकतात. मलाही त्यांनी विकले. त्यांनी अनके मुलींवर अत्याचार केले आहेत. किशनने मला 20 लाख रुपयांना विकत घेतले. त्यांनी मला 8-9 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी धंदा करायला लावला.’

कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेलमधून तीन मुलींची सुटका

कोट्यवधी रुपये मी त्यांना कमावून दिले. मी यातना सहन केल्या आहेत. पण मी आता या अत्याचारांनी थकली आहे. त्यांच्या भीतीने मी लपून बसली आहे. मला न्याय द्या, मी खूप थकली आहे. त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सरकारने मला न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. ते माझ्या पालकांकडे जातात आणि 30-30 आणि 40-40 लाख रुपये मागतात. त्यांना त्रास देतात, ब्लॅकमेल करतात.’

मुलगी म्हणाली की, माझे गावी येणे-जाणे नाही. माझं बालपण त्यांनी बरबाद केलं. माझे आयुष्य उध्वस्त केले. मी लोकांनाही पुढे येण्याची विनंती करते. भीतीपोटी कोणी बोलत नाही हे तुम्हा लोकांना माहीत आहे. माझ्या कुटुंबीयांना मारलं किंवा काहीही झालं तर त्याला किशन पोलाडा जबाबदार असेल.’

जस्ट डायलचा वापर वेश्या व्यवसायासाठी ? स्पा, मसाजच्या चौकशीनंतर समोर आलं 150 मुलींचं ‘रेटकार्ड’

राष्ट्रीय बाल आयोगाच्या अध्यक्षांनी दिली होती भेट

भिलवाडा येथे स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री झाल्याची घटना समोर आल्यानंतर राष्ट्रीय बाल आयोग प्रियंका कानूनगो यांनी भीलवाडा येथे भेट देऊन 27 मुले सापडली नसल्याचा निष्कर्ष काढला होता, ज्यांना गावाबाहेर पाठवण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

भिलवाडा एसपी आदर्श सिद्धू म्हणाले की, हा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे. व्हिडिओ समोर येताच मुलीची ओळख पटली असून तिचा शोध घेण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डेप्युटी एसपींकडे सोपवण्यात आला असून, मुलीचे जबाब घेण्यात आले असून, तिचे मेडिकलही करण्यात आले आहे. लवकरच कारवाई केली जाईल. आरोपींची चौकशी सुरू आहे. लवकरच याप्रकरणी गुन्हा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…