लाइव्ह

Lok Sabha elections 2024 Live : बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

bajarange sonawane
बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
social share
google news

Maharashtra Marathi news Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सुरू असलेल्या घडामोडींबद्दलचे ताजे अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दलची माहिती वाचा एकाच ठिकाणी...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 06:58 PM • 20 Mar 2024

    बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी आज राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सोनवणेंच्या या प्रवेशानंतर आता ते बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे विरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

  • 05:38 PM • 20 Mar 2024

    उद्धव साहेबांनी सांगितलं तर मी 100% उत्तर मुंबईत लोकसभा जिंकेल - विनोद घोसाळकर

    पियुष गोयल अतिशय श्रीमंत आहेत, बुद्धिमान आहेत. पण ते चुकून इथे आले आहेत, त्यांचा रस्ता चुकलेला आहे.आपल्याला जर उद्धव साहेबांनी उत्तर मुंबईतून संधी दिली तर आपण शंभर टक्के जिंकू असे शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे.

  • 05:37 PM • 20 Mar 2024

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.76 लाख रुपयांचे सोने जप्त

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १.७६ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. महिलांच्या चपला, टुल बॉक्स, कपडे, हॅण्ड ब्लेंडर तसेच खेळण्यातून सोन्याची तस्करी सुरू होती. तसेच अनेक प्रवाशांनी सोने त्यांच्या शरीरात लपवल्याचे तपासत उघड झाले आहे. एकूण ३ किलो सोन जप्त केलं असून वेगवेगळ्या एकूण ८ प्रकरणांमध्ये कस्टम्स विभागाने कारवाई केली होती. यामध्ये चार आयफोनसह १.१८ लाखांचे अमेरिकन डॉलर देखील जप्त करण्यात आलेत

  • 05:35 PM • 20 Mar 2024

    माझी गाडी अडवणारा अजून कोणी नाही- विजय शिवतारे

    दादागिरीची भाषा करू नये विजय शिवतारे यांना सगळे रस्ते माहिती आहेत. विजय शिवतारे यांची गाडी अडवणारा अजून कोणी नाही. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशा धमकींना मी घाबरत नाही, दादागिरी सहन केली जाणार नाही माझा नाद कोणी करू नये असे माजी आमदार विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.

  • ADVERTISEMENT

  • 03:36 PM • 20 Mar 2024

    भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त

    केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटवल्यानंतर आता मुंबई महापालितकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाच्या शर्यतीत मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, महानगर आयुक्त. डॉ. संजय मुखर्जी व बेस्टचे अनिल डिग्गीकर ही तीन नावे चर्चेत होते. पण आता भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. 

  • 01:16 PM • 20 Mar 2024

    'राज ठाकरे उत्तम कलाकार'; राऊतांकडून कौतुक करत कोंडी

     

    "राज ठाकरे उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या मनातील संवेदना आणि खंत मला अधिक माहिती आहे. मोदी आणि शाह यांचे व्यंगचित्र त्यांनी काढले ते आवडले. त्यात भावना होती, म्हणून टाकले. राज ठाकरे यांनी पुलवामा येथील घटनेवर भाष्य केलं. त्यात त्यांनी पुलवामा हत्याकांडाआधी राष्ट्रीय सल्लागार आणि पाकिस्तानचे सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि नंतर हल्ला झाला का? असा प्रश्न उपस्थितीत केला होता", अस म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची बदललेल्या भूमिकेवरून कोंडी केली आहे. 

    यावेळी ते असेही म्हणाले की, "शाहू महाराज यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांना भेटणार आहोत. नंतर सांगली येथे जाऊन वसंतदादा यांना श्रद्धांजली वाहून मिरजमध्ये जाणार आहोत. आमचे दौरे सुरू आहेत. आम्ही थांबणार नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या सभा होतील, त्या निमित्ताने आम्ही शरद पवार यांची भेट घेणार आहोत. वंचित बहुजन आघाडीने सोबत यावं, राजू शेट्टी यांनी सोबत यावं अशी इच्छा आहे. चर्चा पण झाली आहे. मोठे महाराज अपक्ष लढणार नाहीत, ते आदरणीय आहेत. म्हणून उद्धवजी भेट घेण्यासाठी जाणार त्यांचे आशीर्वाद घेऊ", अस संजय राऊत यांनी सांगितले.

  • ADVERTISEMENT

  • 12:22 PM • 20 Mar 2024

    "जयंत पाटलांना तुझी खरी लायकी...", अमोल मिटकरी -रोहित पवारांमध्ये वाक्'युद्ध'

    "तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास. दादा, जे कष्ट करुन इथवर आलेत, ते तुला करायचे काम पडले नाही. शेतकरी पुत्र म्हणून मरेपर्यंत आम्ही दादासोबत आहोत. जयंत पाटील साहेब, आहेत तोपर्यंत जबाबदारीचे पत्र घेऊन घे कारण तुझी खरी 'लायकी' फक्त त्यांनाच माहित आहे. बालबुद्धी हीच तुझी लायकी", अशी टीका अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर केली आहे. 

    "ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं; त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही", अशी टीका रोहित पवारांनी केली होती.

     

    amol mitkari tweet on rohit pawar
    रोहित पवार यांच्या टिकेला उत्तर देणारे आमदार अमोल मिटकरी यांचे ट्विट.
  • 12:04 PM • 20 Mar 2024

    "...मग उरलेल्या जागांवर आंबडेकर काँग्रेसचा उमेदवार पाडणार आहेत का?" 

    प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या या प्रस्तावावर आता संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत आंबेडकरांचं हे रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण असल्याचे म्हटले आहे. 

    "प्रकाश आंबेडकर यांनी एकट्या काँग्रेसला पत्र पाठवलं आणि आणि त्यांच्याकडे सात जागांची यादी मागितली आहे. त्या सात जागांवर पाठिंबा देणार वगैरे… मग उरलेल्या जागांवर त्यांचा (वंचित बहुजन आघाडीचा) उमेदवार उभा करून ते काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का? प्रकाश आंबेडकर असे गुंते निर्माण करतात, वेगवेगळी कोडी टाकतात; प्रकाश आंबेडकरांचं हे रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे", असे म्हणत राऊतांनी आंबेडकरांना लक्ष्य केले आहे. 

  • 11:23 AM • 20 Mar 2024

    Lok Sabha 2024 : अजित पवारांची सोडली साथ! नेत्याचा एका ओळीत राजीनामा

    लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवारांची बीडमधील नेत्याने साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बजरंग सोनावणे यांनी एका ओळीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राजीनामा पाठवला आहे. बजरंग सोनावणे यांनी 2019 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

    bajrang sonawane resigns
    बजरंग सोनावणे यांचा राजीनामा.
  • 10:00 AM • 20 Mar 2024

    'जाहीर माफी मागा', अजित पवार गटाला शरद पवार गटाचा इशारा

    "अजितदादांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'घड्याळ' चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता", असे ट्विट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. 
     
    शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करणारी पोस्ट

    "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही…! असो, पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो!

    काल सर्वोच्च न्यायालयाने विशेष याचिकेवर सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांव्दारे जाहिर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करण्यात येईल!

    दुस-या टप्प्यात अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करावे. असा खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे. 

    परंतु आपण मात्र सदर ट्वीटव्दारे खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. खरी माहिती लपवून खोटं सांगत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर घातलेल्या अटी व शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर, निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणा-या संभाव्य कारवाईलाही सामोरं जा म्हणजे झालं!!!

    आणि हो... गेल्या वेळेसच्या ट्वीटप्रमाणे हे देखील ट्वीट डिलीट करू नका बरं... त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा!!!

    Sharad pawar's NCP hits out at Ajit pawar's ncp
    अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले ट्विट.
  • 09:30 AM • 20 Mar 2024

    आढळराव पाटलांना विरोध, अजित पवार मोहिते पाटलांच्या घरी

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले. पुण्यातील राजगुरुनगर येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोहिते पाटलांची भेट घेतली. 

    शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत मोहिते पाटलांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार गेल्याची माहिती आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध केला. त्यानंतर आता अजित पवार भेटीला गेले. 

    शिवाजी आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला, तर पक्ष स्वागत करेल मात्र मी घरी बसणे पसंत करेल अशी भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटलांनी मांडली होती.

follow whatsapp

ADVERTISEMENT